शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

४८८ एमएलडी पाण्याचा वाढीव कोटा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 01:26 IST

आठवडाभरात दीड दिवसाच्या पाणीकपातीला जिल्ह्यातील नागरिकांनी गेल्या वर्षी तोंड दिले.

सुरेश लोखंडे ठाणे : आठवडाभरात दीड दिवसाच्या पाणीकपातीला जिल्ह्यातील नागरिकांनी गेल्या वर्षी तोंड दिले. यंदा मात्र वाढीव पाणीकोट्याच्या मागणीस मंजुरी देऊन जिल्हा प्रशासनाने नूतन वर्षाची ‘गूड न्यूज’ देऊन नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. गरजेपोटी पाण्याची चोरी करून ते शहरांना पुरवणाऱ्या महापालिका, नगरपालिकांसाठी रोज ४८८ दशलक्ष लीटर वाढीव पाणीकोटा प्रशासनाने मंजूर केला. यामुळे पाणीचोरी थांबणार असून, सोबतच पाणीकपातीचे संकटही दूर होऊन जिल्हावासीयांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी उचलणाºया संस्था, महापालिका, नगरपालिकांमुळे गेल्या वर्षी धरणातील पाणीसाठ्यात १५ टक्के तूट निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी आठवड्यातून ३० तास म्हणजे दीड दिवसाच्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. मात्र, यंदाच्या उत्तम पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढलेला आहे. एवढेच नव्हे तर बारवी धरणाची उंची पाच मीटरपेक्षा जास्त वाढविल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा करणे शक्य झाले आहे. यामुळे या धरणातून आणि उल्हास नदीतून पाणी उचलणाºया महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, स्टेम प्राधिकरण, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ यांच्या दैनंदिन मंजूर पाणीकोट्यात सर्व मिळून ४८८ दशलक्ष लीटर वाढीव पाणीपुरवठ्यास मंजुरी मिळाली आहे. पाणी उचलणाºया यंत्रणा व महापालिका याआधी रोज एक हजार १९२ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करायच्या. आता वाढीव पाणीकोट्यामुळे १६८० दशलक्ष लीटर मुबलक पाणीपुरवठा जिल्ह्यात होऊ घातला आहे. यामुळे पाणीकपातीच्या संकटापासून नागरिकांची सुटका झाली आहे.>अंबरनाथ/बदलापूरचीचिंता मिटणारशहरातील प्रत्येक नागरिकास १२५ लीटर तर ग्रामीण भागातील प्रत्येकास ९५ लीटर पाणीपुरवठ्याचे निकष आहेत. यास अनुसरून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रत्येक महापालिका-नगरपालिकेच्या वाढीव पाणीकोट्यास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीपुरवठा करणाºया एमजेपीला आधी केवळ ९० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीकोटा मंजूर होता. त्यात ५० एमएलडीची वाढ करून या शहरांसाठी आता १४० एमएलडी पाणीकोटा मंजूर झाला आहे.>केडीएमसी/उल्हासनगरलाही मुबलक पाणीस्टेमसह कल्याण-डोंबिवली महापालिकेला (केडीएमसी), उल्हासनगर महापालिका आदींना उल्हास नदीवरून हा वाढीव पाणीपुरवठा मंजूर झालेला आहे. या नदीवरून केडीएमसीला आधी २३४ एमएलडी पाणी उचलण्यास परवानगी होती. आता त्यात ८६ एमएलडीची वाढ करून केडीएमसीला ३२० एमएलडी पाणीकोटा मंजूर झाला आहे.>उद्योग-कारखान्यांसाठी ९०४ एमएलडी पाणीमहाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाद्वारे (एमआयडीसी) उल्हासनगर महापालिका, जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रास, कारखाने आदींना याआधी ५८३ एमएलडी पाणीपुरवठा रोज होत असे. पण, त्यास वाढीव पाण्याची गरज लक्षात घेऊन एमआयडीसी वाढीव म्हणजे ३२१ एमएलडी पाण्याची चोरी करीत असे. पण, आता त्यांचा या ३२१ एमएलडी वाढीव पाणीकोटा मंजूर झालेला आहे. यामुळे एमआयडीसीला ९०४ एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे.>बारवी धरणात आता 79% पाणीसाठालघुपाटबंधारे विभागाची तंबी असतानाही केडीएमसी, स्टेम, एमआयडीसी आणि काही प्रमाणात एमजेपीदेखील जादा पाणी उचलत असे. यामुळे गेल्या वर्षी बारवी धरण आणि आंध्रा धरणातील पाणीसाठ्यात १५ टक्के तूट निर्माण झाली होती. तूट भरून काढण्यासाठी नागरिकांना दीड दिवसाच्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. पण, आता धरणातील पाणीसाठाही वाढलेला आहे. बारवीची पाच मीटरपेक्षा जास्त उंची वाढवली असल्यामुळे या धरणात १६६.३९ दशलक्ष घनमीटरऐवजी यंदापासून २६८.१७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे एमआयडीसीद्वारे मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यासही पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यानुसार, बारवीत आज रोजी 79.87% पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी तो केवळ ६४.९५ टक्के होता.>स्टेमला मिळणार आता ३१६ एमएलडीठाणे शहरातील काही भागांसह भिवंडी महापालिका, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी तालुक्यातील ३४ गावे आदींना स्टेम प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा होतो.यासाठी आधी केवळ २८५ एमएलडी पाणीपुरवठा रोज व्हायचा. पण, आता त्यात ३१ एमएलडीची वाढ करून या शहरांसाठी रोज ३१६ एमएलडी पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.