शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

वाढवण बंदराविरोधातील लढा आणखी तीव्र करणार; संघर्ष समितीची घोषणा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:01 IST

व्यापक आंदोलनासाठी शरद पवारांना भेटणार

पालघर : वाढवण बंदराच्या विरोधातील बंद आंदोलन यशस्वी झाल्यानंतर लढा अधिक तीव्र करण्याची घोषणा वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि त्यांच्या सहकारी संघटनांनी केली आहे. दरम्यान, वाढवण बंदराबाबत भूमिका स्पष्ट करण्याबाबत लवकरच शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.२०१४ साली केंद्रात भाजपचे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर वाढवण बंदराचे भूत पुन्हा स्थानिकांच्या मानगुंटीवर बसविण्याचा अट्टाहास केंद्र सरकारने सुरू केला असून, केंद्राचा ७४ टक्के वाटा तर राज्य सरकारचा २६ टक्के वाटा असा सामंजस्य करार करून सुमारे ६५ हजार ५४४ कोटीच्या खर्चाला आता केंद्र सरकारकडून मान्यताही देण्यात आली आहे. तत्सम विभागांची कुठलीही परवानगी न घेता, जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण आणि परीक्षण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने, संतप्त झालेल्या डहाणू ते कफ परेडच्या किनाऱ्यावरील मच्छीमार, शेतकरी, आदिवासी बांधवांनी एकत्र येत बंद पाळला होता. त्या अनुषंगाने आपली पुढील रणनीती आखण्यासाठी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ, ठाणे जिल्हा समाज संघ, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना आदींनी बुधवारी पालघरमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी वाढवण बंदर संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, सरचिटणीस वैभव वझे, अनिकेत पाटील, एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, पुर्णिमा मेहेर, ज्योती मेहेर, उज्ज्वला पाटील, ठाणे जिल्हा मच्छीमारचे अध्यक्ष जयकुमार भाय, राजन मेहेर, दत्ता करबट आदी उपस्थित होते.स्थानिक पातळीवर आमदारांचा वाढवण बंदराला विरोध असला, तरी त्यांच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन पक्षाची बंदरासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी शरद पवार यांची लवकरच भेट घेणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. या सर्वांच्या सहकार्याने एक मोठा लढा उभारण्याचा निश्चय करण्यात आला. यावेळी सीआरझेड, सीझेडएमपी कायद्यांत बदल करून मच्छीमारांचे अस्तित्व केंद्रातील भाजप सरकारने नष्ट करायला घेतल्याचा आरोप करण्यात आला. अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे अनेक प्रयत्न करूनही संघर्ष समितीला भेट मिळत नसल्याने यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्य सरकार जर आपली जबाबदारी झटकत असेल, तर दिल्लीला धडक देण्याची घोषणा एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जाहीर केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार