शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात 491 कोटी रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 00:02 IST

ठाणे महापालिका : स्थायी समितीने वाढ केल्याने अर्थसंकल्प गेला तीन हजार २४६ कोटी ३२ लाखांवर

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनामुळे कोणत्याही नव्या प्रकल्पांची घोषणा न करता काटकसरीचा दोन  हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला होता;  परंतु यात स्थायी समितीने ४९१ कोटींची वाढ सुचविली आहे. त्यामुळे तो तीन हजार २४६ कोटी ३२ लाखांवर गेला आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी मालमत्ता, पाणीपट्टी, जाहिरात, पार्किंग, शहर विकास विभाग, स्थावर मालमत्ता, सार्वजनिक बांधकाम अशा सर्व विभागांचे टार्गेट वाढविले असून,  ४९१ कोटींची वाढ केली असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी दिली. आता तो महासभेच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ५ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला २०२०-२१ चे दोन हजार ८०७ कोटींचे सुधारित, तर २०२१-२२ चे दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा मूळ अर्थसंकल्प सादर केला. त्यावर स्थायी समितीने १५ दिवस चर्चा केल्यानंतर मंगळवारी मंजुरी दिली. सर्व विभागांशी चर्चा केल्यानंतर २०२०-२१ च्या सुधारित अर्थसंकल्पात ११० कोटी ९३ लाखांची वाढ केल्याने सुधारित अर्थसंकल्प दोन हजार ९१७ कोटी ९६ लाखांवर गेला असून, मूळ अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ केली असल्याने तो तीन हजार २४६ कोटी ३२ लाखांवर गेला आहे. 

कोरोनामुळे पालिकेचे उत्पन्न कमालीचे घटले असल्याने मूळ अर्थसंकल्पात प्रशासनाने एक हजार ३०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे जे प्रकल्प सुरू  आहेत त्यांनादेखील ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती. याशिवाय नगरसेवकांना  प्रभागात कामे करणे कठीण झाले होते. यासाठी मूळ अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ केल्याची माहिती सभापतींनी दिली. उत्पन्न वाढीसाठी मालमत्ताकरामध्ये १०० कोटी, जाहिरात फीमध्ये १७ कोटी ६३ लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग  १० कोटी, स्थावर मालमत्ता भाड्यापोटी १९ कोटी, शहरविकास ३१३ कोटी, पाणीपुरवठा विभाग २५ कोटी इतर विभागांकडून सहा कोटी ३७ लाख, अशी ४९१ कोटींची वाढ केली आहे

मॉल, मल्टिप्लेक्समधील दुकानांना कर लागणार सर्वसामान्य ठाणेकर प्रामाणिकपणे कर भरतो. मात्र मल्टिप्लेक्स आणि मॉलमध्ये मोकळ्या जागेत अनेक दुकाने थाटली असून, याचा फायदा केवळ मॉलच्या मालकांना होतो. त्यामुळे महापालिकेचेदेखील नुकसान होत असून, त्यामुळे या सर्व दुकानांना मालमत्ताकर लावण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे