शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल–वसई रेल्वे मार्गावर मेमु  रेल्वेची संख्या वाढवा; डॉ. श्रीकांत शिंदे यांची संसदेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 16:43 IST

पनवेल – वसई मार्ग हा उपनगरीय रेल्वे मार्ग म्हणून याआधीच घोषित करण्यात आला आहे,

डोंबिवली : पनवेल – वसई मार्ग हा उपनगरीय रेल्वे मार्ग म्हणून याआधीच घोषित करण्यात आला आहे, परंतु कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या डोंबिवली आणि दिवा स्थानकादरम्यान असणाऱ्या अप्पर कोपर रेल्वे स्थानकावरून दर दिवशी सुमारे २५,००० प्रवासी प्रवास करत असताना देखील दिवसातून केवळ ४ मेमु गाड्या सोडण्यात येतात. सकाळी ५:४५ मेमु गाडीनंतर थेट स. १०:१९ ची मेमु गाडी आहे, तसेच रात्रीची शेवटची गाडी ८:०० वा. ची आहे. यामुळे सकाळी येथील नागरिकांना आपल्या कामकाजाच्या ठिकाणी वेळेच्या साधारणपणे दोन तास आधी पोहोचावे लागत असल्याची माहिती खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या अप्पर कोपर स्थानक परिसरात विविध विकास कामे तसेच लोकसंख्या वाढत असल्यामुळे रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीमध्ये रेल्वे पकडताना नागरिकांच्या जीवाला हानी पोहोचू शकते. नागरिकांना या तोकड्या रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळे होणारा त्रास आणि दैनंदीन प्रवासी संख्या वाढत असल्यामुळे या रेल्वे स्थानकावर वाढणारा ताण लक्षात घेता सदर पनवेल – वसई मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी तसेच उपनगरीय रेल्वे मार्ग म्हणून याआधीच घोषित या पनवेल – वसई मार्गावर मेमु ऐवजी उपनगरीय लोकल रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु करावी, अशी आग्रही मागणी आज खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी संसदेच्या अधिवेनादरम्यान शून्य प्रहर काळात केली.