शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील हवेतील प्रदुषणात वाढ, शहरातील हवा अतिप्रदुषीत गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 15:54 IST

मुंबईतील हवी प्रदुषीत झाली असतांनाच आता ठाण्यातील हवा देखील प्रदुषीत होत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरातील हवेची गुणवत्ता अतिप्रदुषीत गटात मोडल्याचे दिसून आले आहे.

ठाणे  : मुंबईतील हवी प्रदुषीत झाली असतांनाच आता ठाण्यातील हवा देखील प्रदुषीत होत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरातील हवेची गुणवत्ता अतिप्रदुषीत गटात मोडल्याचे दिसून आले आहे. शहरातील हवा १०१.५५ टक्के प्रदुषित आढळली आहे. मागील काही दिवसापासून ठाण्यातही काही भागात सकाळ किंवा दुपारचे वातावरण प्रदुषित झाल्याचे दिसत आहे. त्यातही ठाण्यातील वाहनांची दिवसभर वर्दळ असलेला तीनहात नाका परिसर देखील अतिप्रदुषणीत गटात मोडला असल्याचे दिसून आले. तीनहात नाका परिसरात वाहनांची वर्दळ आणि बाजूलाच सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामुळे हवा प्रदुषित झाल्याचे दिसून आले आहे.

मागील काही दिवसात मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही हवेतील प्रदुषणात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही दिवस सकाळच्या सत्रत ढगाळ वातावरण तसेच धुक्याचे वातावरण दिसत होते. मात्र शहरातील प्रदुषणाची पातळी तपासली असता ठाण्याची हवा देखील दुषीत झाल्याचे दिसून आले आहे.  शहराची एकूणच प्रदुषणाची पातळी पाहली असता, ती १०१.५५ टक्के म्हणजेच अतिप्रदुषीत आढळून आली आहे.

मंत्री गिरीश महाजनांनी अतिरिक्त Y+ सुरक्षा नाकारली; पोलीस महासंचालकांना पत्र

तीन हात नाका परिसर देखील अतिप्रदुषित गटात मोडला असून येथील हवा प्रदुषण १५४.७८ टक्के एवढी आढळून आली आहे. येथील हवेतील धुलीकणातही वाढ झाल्याचे दिसत आहे. या भागात सध्या वाहनांची वर्दळ वाढली असून तसेच या भागात मागील काही वर्षापासून मेट्रोचे काम सुरु आहे, त्यामुळे येथील प्रदुषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील महत्वाच्या १६ चौकांमधील प्रदूषणाची मोजणी ही या अंतर्गत केली जाते. त्यानुसार शहरातील प्रदूषणाचे प्रमाण हे १०१.५५ टक्के आढळून आले आहे. औद्योगिक परिसरातील रेप्टाकॉस ब्रेट अॅण्ड कंपनी अंतर्गत वागळे इस्टेट शास्त्नी नगर आदी ठिकाणीही हवेतील प्रदूषणाही काहीसे वाढले असून येथे तर ६९.८३ टक्के हवा प्रदूषित आढळली आहे.

तर निवासी परिसर असलेल्या कोपरी प्रभाग कार्यालय अर्थात रहिवास क्षेत्रतही हवा अतिप्रदुषित आढळली असून येथील हवेची गुणवत्ता १००.६७ टक्के आढळली आहे. व्यावसायिक परिसर असलेल्या शाहू मार्केट नौपाडा परिसरातील हवा देखील अतिप्रदुषीत आढळली असून येथील प्रमाण हे ८०.९२ टक्के एवढे आहे.  प्रदूषण विभागामार्फत हवेतील दर्जा तापसण्याबाबत चार गट केलेले आहेत. यात हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल या रंगाचा समावेश आहे. त्यात हिरवा रंग अतिशुद्ध हवा म्हणून नोंद होते. तर पिवळ्या रंगात मध्यम शुद्ध नारंगी रंगात प्रदूषित तर लाल रंग असलेला परिसर  अतिप्रदूषित गटात मोडतो.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबई