शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:39 IST

२२ कोटींची खिरापत; मौनी भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ठाणे : ठाणे महापालिकेचा देशातील पहिला डिजिटल प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाच आता स्मार्ट सिटीचे संचालक मंडळही यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. संबंधित एजन्सीला निविदा प्रक्रिया न राबवता मुदत संपण्याच्या आठ महिने आधीच दोन वर्षांची मुदतवाढ देऊन आतापर्यंत २२ कोटींचे बिलदेखील दिल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हे सर्व घडत असताना संचालक मंडळाला याची माहिती नव्हती का, असा सवाल आता करण्यात येत आहे.डिजी ठाणे या प्रकल्पाचा शुभारंभ २३ जानेवारी २०१८ रोजी करण्यात आला. या संपूर्ण प्रकल्पांचा खर्च ३३ कोटी असून आतापर्यंत संबंधित एजन्सीला २२ कोटींचे बिल अदा केले आहे. मात्र, ते देताना किती नोंदणी झाली? किती टार्गेट पूर्ण केले? काय कामे केली, याचे निकष तपासले नसून यासंदर्भात आक्षेप घेण्यात आले आहेत. आठ महिने मुदत शिल्लक असताना आधीच विनानिविदा दोन वर्षांची मुदतवाढ दिल्याचे उघड झाले आहे. आता विधानसभेत यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारण्यात आल्याने पालिकेचे संबंधित विभाग अडचणीत आले आहेत. तसेच यामध्ये आता स्मार्ट सिटी प्रा.लि. कंपनीचे संचालक मंडळही अडचणीत आले असून त्यांनी या बाबींची खातरजमा केली नव्हती का? मंडळातील सदस्यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतला का, असे अनेक प्रश्न आता संचालक मंडळाला केले जाऊ लागले आहेत. विधिमंडळ सभागृहातील हा विषय असल्याने यावर पालिका प्रशासनातील अधिकारी बोलत नसले, तरीदेखील यामधील अटी आणि शर्तींचा कुठेही भंग झालेला नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.डिजी ठाणेसंदर्भात जे काही आरोप केले जात आहेत, त्याचा सविस्तर खुलासा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी करावा. -नरेश म्हस्के, महापौरठामपामाझ्या कार्यकाळात हे प्रकरण झालेले नाही, त्यामुळे याचा सविस्तर अभ्यास करूनच यावर भाष्य करणे योग्य ठरेल.-प्रमिला केणी,विरोधी पक्षनेत्या, ठामपाआम्ही पारदर्शकपणे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. प्रशासनाच्या चुकीमुळेच हा प्रकार झालेला आहे. त्यामुळे त्यांनीच याचे उत्तर द्यावे.- संजय वाघुले, गटनेते, भाजप, ठामपा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका