शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढ!

By सुरेश लोखंडे | Updated: March 6, 2018 14:59 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यात दु:खत घटनेमुळे, जेल झाल्यामुळे, अपघातग्रस्त असल्यामुळे, ऑनलाइन अर्ज दाखल करता न आल्यामुळे आदी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाही. या शेतक-यांची दखल घेऊन त्यांना पुन्हा ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी मिळाली

ठळक मुद्देपात्र शेतक-याना 31 मार्चर्पयत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाहीशेतक-यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्व:त पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी

ठाणे : पात्र असूनही विविध कारणास्तव काही शेतक-याना कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करता आला नाही, अशा पात्र शेतक-याना 31 मार्चर्पयत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतक-यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्व:त पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी शेतक-यांना आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यात दु:खत घटनेमुळे, जेल झाल्यामुळे, अपघातग्रस्त असल्यामुळे, ऑनलाइन अर्ज दाखल करता न आल्यामुळे आदी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाही. या शेतक-यांची दखल घेऊन त्यांना पुन्हा ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ जिल्ह्यातील शिल्लक असलेल्या जास्तीत जास्त ३०० शेतक-यांना होण्याची शक्यता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कु:हाडे यांनी लोकमतला सांगितले.शासनाने जाहीर केलेल्या या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाची विविध पध्दतीने तपासणी करून ठाणे व पालघर जिल्ह्यातील 34 हजार 37० शेतक-यांना 112 कोटी 36 लाख 32 हजार रूपये कर्जमाफी मिळाली आहे. ०नियमित भरणा करणा:या शेतक-यांसह थकबाकीदार शेतक-यांपैकी ठाणे जिल्ह्यातील 17 हजार 746 शेतकरी आहेत. त्यांना 55 कोटी 18 लाख 86 हजार रूपये तर पालघरच्या 16 हजार 624 शेतक:यांना 57 कोटी 17 लाख 45 हजार रूपये कर्जमाफीचा लाभ झाल्याचे टीडीसीसी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भगिरथ भोईर यांनी सांगितले.दीड लाखार्पयत थकबाकीदार 18 हजार 991 शेतक:यांना 85 कोटी 94 लाख 4० हजार प्राप्त झाले. तर नियमित भरणा करणा:या 15 हजार 176 शेतक-यांनाही 24 कोटी सात लाख 37 हजार रूपयांचा लाभ झाला आहे. याशिवाय दीड लाख रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या 2०3 शेतक-यांच्या बँक खात्यात देखील 23 कोटी 45 लाख 43 हजार रूपये जमा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार