ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ६११ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ६३ हजार ६२५ रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २६३ वर गेली आहे.
ठाणे शहरात १८५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६१ हजार ९३० झाली आहे. शहरात दोन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ३८४ झाली. कल्याण-डोंबिवलीत १७५ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ६२ हजार ७८४ रुग्ण बाधित असून एक हजार १९६ मृत्यूंची नोंंद आहे.
उल्हासनगरमध्ये १३ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ८१६ झाली आहे. आतापर्यंत ३७२ मृतांची नोंद कायम आहे. भिवंडीला सात बाधित आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधित सहा हजार ७७६ असून मृतांची संख्या ३५५ कायम आहे. मीरा-भाईंदरमध्ये ३८ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या २७ हजार आठ असून मृतांची संख्या ८०४ झाली आहे.
अंबरनाथला १२ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधित आठ हजार ७७७ असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ४१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित नऊ हजार ८७२ झाले आहेत. या शहरात एक मृत्यू आहे. आता येथील मृत्यूंची संख्या १२७ आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधित १९ हजार ५०९ आणि आतापर्यंत ५९२ मृत्यूंची नोंद कायम आहे.