शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाच्या ३५४ रुग्णांची वाढ; ११ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सोमवारी ३५४ रुग्णांची वाढ झाली असून, ११ रुग्ण गेल्या २४ तासांत दगावले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सोमवारी ३५४ रुग्णांची वाढ झाली असून, ११ रुग्ण गेल्या २४ तासांत दगावले. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ३८ हजार १३५ रुग्णांसह १० हजार ८५४ मृतांची संख्या नोंदली गेली आहे.

ठाणे शहरात ५८ रुग्ण आढळले. यासह येथील रुग्णसंख्या एक लाख ३४ हजार ४६९ झाली. तर तीन बाधित दगावल्याने मृतांची संख्या दोन हजार ४० झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत ९७ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख ३७ हजार ६२८ झाली. येथे दिवसभरात मृत्यू नाही. यामुळे दोन हजार ६५० मृत्यू कायम आहेत. उल्हासनगरला सात रुग्णांच्या वाढीसह दोन मृत्यू झाले. आता येथील रुग्णसंख्या २० हजार ८९० झाली असून, ५२८ मृतांची संख्या नोंदली आहे. भिवंडीला दिवसभरात चार रुग्ण सापडले असून, एकही मृत्यू नाही. येथील एकूण रुग्ण १० हजार ६६० झाले असून, मृत्यू ४६६ कायम आहेत. मीरा-भाईंदरला ५२ रुग्णांची वाढ होऊन एका मृताची आहे. आता येथील रुग्णसंख्या ५१ हजार १४० झाली असून, एक हजार ३४४ मृतांची नोंद आहे.

अंबरनाथला १२ रुग्णांची वाढ झाली. तर एक जण दगावला. आता येथील रुग्णसंख्या १९ हजार ९१८ झाली असून, ५१९ मृतांची नोंद झाली आहे. कुळगाव-बदलापूरमध्ये २२ रुग्णांची भर पडली तर एक मृत्यू आहे. आता येथे २१ हजार ३६१ रुग्णांसह ३५० मृतांची नोंद झाली आहे. जिल्हा परिषदेच्या गावपाड्यांमध्ये ३३ रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. या परिसरात आतापर्यंत ३९ हजार ९३४ रुग्णांची वाढ होऊन एक हजार १९५ मृतांची नोंद झाली आहे.