शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अवकाळीने आवक घटली; भाजीपाला कडाडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 01:02 IST

शेतकऱ्यांसह ग्राहकही हवालदिल । पाच बाजार समित्यांत कृषीमाल आलाच नाही

सुरेश लोखंडे

ठाणे : भाजीपाला व अन्नधान्यपुरवठा करणाºया राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांस लागणाºया भाजीपाल्याची आवक घटली आहे. भिवंडी, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी व शुक्रवारी कृषीमालाची आवक झाली नाही. तर, नवी मुंबई व कल्याण बाजार समित्यांमध्ये अवघे ८०७ ट्रक व टेम्पोंद्वारे भाजीपाला, अन्नधान्याची आवक झाली आहे. यामुळे भाज्यांचे भाव कडाडले असून नुकसानीने शेतकरी तर महागाईने ग्राहकही हवालदिल झाला आहे.

राज्यभरात सुरू असलेल्या या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामध्ये खरिपाच्या हंगामासह भाजीपाला, कडधान्य, कांदा, टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर असल्यामुळे शेतकºयांना शेतातही जाणे शक्य होत नाही. काही ठिकाणी तर रस्ता उपलब्ध असला तरी ट्रक, टेम्पो शेतीतील चिखलात फसण्याची शक्यता आहे. तसेही शेतात चिखल असल्यामुळे पाय ठेवणेही शक्य नाही. त्यात संध्याकाळी जीवघेणा अवेळी पाऊस विजेच्या कडकडाटात पडत आहे. यामुळे अंगावर वीज पडण्याची भीती असल्यामुळे शेताकडे जाणे जीवावर बेतत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेकर जनतेसाठी होणारी ताज्या भाजीपाल्याची आवक घटली आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह अन्यही ठिकाणी भाजीपाला, कांदे, बटाटे, फळे, कृषीमाल नवी मुंबईत अवघा ९३ ट्रक व ६०६ टेम्पो भाजीपाला आला आहे. कल्याणला भाजीपाला अवघे १८ ट्रक, ८१ टेम्पो आले आहेत. कांदा-बटाट्यांचे नऊ ट्रक आणि १३ टेम्पो आले होते.आवक न झालेल्या भाज्यानवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी मेथी, कोथिंबीर, वांगी, तोंडली, टोमॅटो, ज्वाला व लवंगी मिरचीही आलेली नाही. शेपू, पालक, मुळा, मेथी आदींचीदेखील आवक आज झालेली नाही. याप्रमाणेच भेंडी, भोपळा, चवळी, बीट, घेवडा, पडवळ, टोमॅटोचादेखील एकही ट्रक नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच शुक्रवारीही भाजीपाल्याची आवक नव्हती.पालेभाज्या भाज्यांचे दरपालक ४०मेथी ५०चवळी २५कोथिंबीर जुडी ८० ते ९०शेपू ३० ते ४०मुळा २०लालमाठ २०फळभाज्या भाज्यांचे दरफ्लॉवर १००कोबी ८०फरसबी १००सिमला मिरची १००गवार १२०टोमॅटो ६०तोंडली १००भेंडी १००मटार १६०घेवडा १००फळभाज्या भाज्यांचे दरदोडका १००गाजर १०० ते १२०काकडी ६०मिरची १२०आले २००अवकाळी पावसामुळे आवक घटली असून यामुळे दर वाढल्याचे विक्रेते संभाजी खेडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणे