शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहराच्या पहिल्या नाट्यगृहाचे उद्घाटन; तर प्रवेशद्वाराबाहेर भाजपाच्या माजी आमदाराचे आंदोलन

By धीरज परब | Updated: October 11, 2022 23:05 IST

शहराचे पहिले नाट्यगृह शासनाने विकासकाला टीडीआर मंजूर केल्याने बांधून पूर्ण झाले. आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.

मीरारोड - मीरा भाईंदर शहराच्या पहिल्या नाट्यगृहाचे  उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहात होत असताना प्रवेशद्वारा बाहेर मात्र भाजपाचे माजी आमदार व माजी नगरसेवकांनी प्रवेशावरून निषेध करत पत्रिका फाडल्या व प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. 

शहराचे पहिले नाट्यगृह शासनाने विकासकाला टीडीआर मंजूर केल्याने बांधून पूर्ण झाले. आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला असताना कार्यक्रमासाठी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता हे माजी महापौर ज्योत्सना हसनाळे व डिंपल मेहतां सह काही माजी नगरसेवक सह आले. नाट्यगृहात आसन व्यवस्था फुल्ल होऊन गर्दी झाली असल्याने प्रवेशद्वारावर कोणालाच सोडले जात नव्हते. 

पोलिसांनी आत गर्दी झाल्याने निमंत्रण पत्रिकेवर नाव असलेल्या मेहता व माजी महापौरांना आत सोडण्यास तयारी दर्शवली. पण माजी नगरसेवकांसह अन्य काही कार्यकर्ते असल्याने त्यांना मात्र सोडण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या मेहता, हसनाळे व माजी नगरसेवक आदी प्रवेशद्वारा बाहेरच खाली बसले. त्यांनी पालिकेच्या निमंत्रण पत्रिका फाडून फेकल्या. प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. 

पोलीस उपायुक्त अमित काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे आदी अधिकाऱ्यांनी येऊन त्यांना समजवण्याचा व आत जागा  उपलब्ध करून देतो असे सांगितले. मात्र मेहता आणि त्यांचे समर्थक निषेध करण्यावर ठाम होते. पालिका व पोलीस प्रशासनाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असा आरोप मेहता समर्थकांनी केला. 

तर निमंत्रण पत्रिकेत नावे होती त्यांना आत पोलीस सोडण्यास तयार होते. बाकीच्यां बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन जागेचा प्रश्न सुटला असता.  मात्र सामंजस्य न दाखवता कार्यक्रमाला गालबोट लावत गोंधळ घालणे चांगल्या प्रसंगी अशोभनीय व बेजबाबदारपणाचे आहे. अश्या गोंधळींवर कारवाई व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुद्धा जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.    

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMira Bhayanderमीरा-भाईंदर