शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चां कार्यक्रमाला गालबोट

By सदानंद नाईक | Updated: October 7, 2023 17:20 IST

उल्हासनगर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत शहरातील विविध चौकात नुक्कड सभा घेऊन सत्ताधारी पक्षाच्या कारभाराचा भांडाफोड करीत होते.

उल्हासनगर : शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात एका उपस्थित तरुणाने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने, भाजप आक्रमक होऊन, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पक्षाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांच्यासह २७ जणां विरोधात गुन्हा दाखल झाला. तसेच पोलिसांनी पुढील कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द केल्या आहेत. 

उल्हासनगरशिवसेना ठाकरे गटाच्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत शहरातील विविध चौकात नुक्कड सभा घेऊन सत्ताधारी पक्षाच्या कारभाराचा भांडाफोड करीत होते. याप्रकारने नागरिकांत चर्चेला उधाण आले असतांना शुक्रवारी कॅम्प नं-३ येथे झालेल्या होऊ द्या चर्चा या नुक्कड सभेत पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना नोकऱ्या दिल्या का? असा प्रश्न उपस्थित तरुणांना विचारला. त्यावेळी एका तरुणाने पंतप्रधान मोदी यांच्या बाबत अपशब्द काढले. सादर कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, पक्ष कार्यकर्त्यांनी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी पदाधिकार्यांची बैठक बोलावून, रात्री थेट मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठले.

शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या नुक्कड सभेच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या बाबत एका तरुणाने अपशब्दाचा वापरल्याने, उपस्थितांनी हसून प्रतिक्रिया दिला. असा आरोप भाजपचे रामचंदानी यांनी केला. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. भाजपच्या शिष्टमंडळात शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, प्रकाश माखिजा, कपिल अडसूळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अखेर रात्री उशिरा कपिल अडसूळ यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, शहरप्रमुख रवींद्रसिंग भुल्लर, दिलीप मिश्रा, शिवाजी जावळे, शोभा जाधव यांच्यासह तब्बल २६ जणां विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकाराने शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. 

ही तर हुकूमशाही, कोर्टात जाणार - धनंजय बोडरे (शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक) होऊ द्या चर्चा कार्यक्रमात उपस्थितांना मोदी सरकारने नोकऱ्या दिल्या का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरील तरुणांच्या प्रतिक्रियेला शिवसेना व पक्षाचे पदाधिकारी जबाबदार नाही. त्यावरून कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द करून गुन्हे दाखल करणे।म्हणजे ही वाटचाल हुकूमशाहीकडे आहे. लोकशाही धोक्यात आल्याचे संकेत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना