शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांत गटबाजी, यांची उचलबांगडी करा - भारत गंगोत्री

By सदानंद नाईक | Updated: August 28, 2023 17:12 IST

ठाण मांडून बसलेल्या अश्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री राज्य शासनाकडे करणार आहेत.

उल्हासनगर : महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांत गतबाजीला ऊत आल्याने, कंत्राटी कामगाराच्या वेतनावर ठेकेदाराला डल्ला, सुरक्षा रक्षकांनी गेल्या तीन वर्षात एकही सुट्टी न घेणे, बोगस कर्मचारी, रस्त्याची दुरावस्था आदी असंख्य समस्या उभ्या ठाकल्या आहेत. ठाण मांडून बसलेल्या अश्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री राज्य शासनाकडे करणार आहेत.

 उल्हासनगर महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने, मूलभूत सुखसुविधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकून ८३ सुरक्षा रक्षकांनी एकही दिवस सुट्टी घेतली नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका सुरक्षा रक्षकाने लग्न असतानाही त्याला महापालिका सेवेत हजर दाखविण्यात आले. तर अनेक जणांनी तीन वर्षात रुग्णालयात उपचार घेऊनही आल्यावरही कामावर हजर असल्याची नोंद आहे. हे कमी म्हणून की काय, नगररचनाकार विभागात वर्षानुवर्षे बोगस कर्मचारी काम करीत असल्याचे उघड झाले. रस्ता बांधणी, कोट्यवधींकिमतीचे साहित्य खरेदी करूनही, महापालिका रुग्णालयाचे खाजगीकरण, रस्त्याची दुरावस्था, महापालिका शाळा मैदानावर खाजगी संस्थेला दिलेली सनद, शहरातील खुल्या व विविध शासकीय कार्यालयाच्या जागेवर सनद, आरसीसीची अवैध बहुमजली बांधकामे, पाणी टंचाई, डम्पिंगचा प्रश्न आदी असंख्य समस्या उभ्या ठाकल्या असतांना प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या गटबाजी निर्माण झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे गंगोत्री यांनी केला आहे.

 महापालिकेत प्रशासकीत राजवट असल्याने, माजी नगरसेवक, सतर्क नागरिक महापालिका मुख्यालयात जाऊन विकास कामाचा जाब विचारात नसल्याने, प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले. दरम्यान अधिकाऱ्यांत गटबाजी निर्माण होऊन कर्मचाऱ्यांची विभागणी अधिकाऱ्यांत होऊ लागल्याने, महापालिकेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातूनच चलती है क्या बाहेर? असे प्रकार घडत आहेत. एकूणच महापालिकेचा कारभार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून, त्याजागी नवीन अधिकारी पाठविण्याची मागणी राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री यांनी दिली आहे. प्रतिनियुक्तीचा काळ संपूनही ठाण -महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अनेक अधिकाऱ्याचा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपूनही ठाण मांडून बसले आहे. प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढविण्यासाठी अनेक अधिकारी मंत्रालयाचे व नेत्यांचे उंबरठे झिजवीत आहेत. काही अधिकारी यामध्ये यशस्वी झाले असून त्यांनी चिरीमिरी दिल्यानेच, त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढविल्याने बोलले जात आहेत. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरUlhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022