उल्हासनगर : भुयारी गटार योजनेअंतर्गत खोदलेल्या रस्त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. हवेतील प्रदूषण आणि अतिसूक्ष्म धूळ कमी करण्यासाठी, त्यावर पाण्याचे अतिशय बारीक तुषार उडवणाऱ्या मशिनरीचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र या मशीनद्वारे झाडाला पाणी देणे, पुतळे धुण्याचे काम केले जात आहे. महापालिका मालकीच्या मशीन असतानाही मशीन हाताळल्या प्रकरणी लाखोंचे बिल अदा करण्यात येत आहे.
उल्हासनगरात अमृत योजने अंतर्गत भुयारी गटार व पाणी पुरवठा वितरण योजनेच्या कामासाठी रस्ते खोदण्यात येत आहे. तसेच एमएमआरडीए व महापालिकेच्या शेकडो निधीतून विकास कामे सुरू आहेत. या विकास कामामुळे शहरांत धुळीचे प्रमाण मोठे आहे. शहरवासियांना धुळीपासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने काहीं वर्षांपूर्वी दोन मिस्ट स्प्रे मशीन व दोन रस्त्यातील धूळ साफ करणाऱ्या मशीनची कोट्यावधीच्या निधीतून खरेदी केल्या आहेत.. मात्र त्या मशीन वापरण्यासाठी तज्ज्ञ ड्रायव्हर व कर्मचारी महापालिकेकडे नसल्याचे कारण पुढे करून, चारही मशीन खाजगी ठेकेदाराला चालविण्यासाठी दिल्या आहेत.
ठेकेदाराची केली सोय?
शहरातील धुळीवर पाण्याचा तुषार सोडणारी मशीन व धूळीने माखलेले रस्ते साफ करणाऱ्या चारही मशीन खाजगी ठेकेदाराला चालविण्यासाठी दिल्या आहे. या मशीन चालविण्यापोटी महापालिका दरमहा लाखोचे बिल खाजगी ठेकेदाराला अदा करीत आहे. त्यामुळे या मशीन ठेकेदाराच्या सोयीसाठीच खरेदी केल्याची टीका होत आहे. यापूर्वी अशा मशीनसह ठेकेदार महापालिकेला सुखसुविधा देत होता.
झाडांना पाणी देणे व पुतळे धुण्यासाठी मशीनचा वापर शहरातील हवेतील धुलीकण खाली बसवण्यासाठी मशीनद्वारे मिस्ट स्प्रे मारला जातो. मात्र या मूळ उद्देशाला हरताळ फासून या मशीनचा वापर इतरत्र करण्यात येतो.
खाजगी जाहिरातीचे बोर्ड कशासाठी
रस्त्याच्या मधोमध डिव्हायडरमध्ये झाडे लावली असून त्या झाडांना या मशीनद्वारे पाणी देऊन महापालिका झाडाची देखरेख करते. मग डिव्हायडरमध्ये खाजगी जाहिरात फलके कोणाची? त्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
मशीनचा वापर बहुरूपी
रात्री १० ते पहाटे ४ पर्यंत महापालिका हद्दीतील रस्त्याची साफसफाई दोन मशीनद्वारे करून धूळ संकलन केली जाते. तर अन्य दोन मशीनमधून धुळीवर पाण्याची फवारणी केली जाते. याव्यतिरिक्त रस्ता धुणे, झाडाला पाणी देणे, पुतळे धुणे आदी कामे केली जाते. - एकनाथ पवार - स्वच्छता निरीक्षक-महापालिका
Web Summary : Ulhasnagar's dust control machines, meant for spraying roads, are watering plants and cleaning statues. Despite owning the machines, the municipality pays a private contractor lakhs monthly, raising questions about misuse and favoring private interests.
Web Summary : उल्हासनगर में धूल नियंत्रण मशीनें सड़कों पर छिड़काव के बजाय पौधों को पानी दे रही हैं। स्वामित्व के बावजूद, नगरपालिका निजी ठेकेदार को लाखों का भुगतान करती है, जिससे दुरुपयोग और निजी हितों को बढ़ावा देने पर सवाल उठते हैं।