शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर भाजप बैठकीत शिवसेनेविरोधात सूर; आमदार गणपत गायकवाड यांना सहानुभूती

By सदानंद नाईक | Updated: February 10, 2024 18:52 IST

उल्हासनगरातील टॉउन हॉलमध्ये दोन दिवसांपूर्वी भाजप बुथ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

उल्हासनगर : शहरातील टॉउन हॉल मध्ये पार पडलेल्या भाजप बुथ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सुर शिवसेना विरोधात होता. याबाबत शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांना संपर्क केला असता त्यांनी काही उत्साही पदाधिकाऱ्यांना बैठकीत शांत केल्याचे सांगितले आहे.

उल्हासनगरातील टॉउन हॉल मध्ये दोन दिवसांपूर्वी भाजप बुथ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत लोकसभा निवडणूक बुथबाबत व गाव चलो अभियान याबाबत माहिती देऊन, प्रत्येकाच्या कामाची माहिती दिली. बुथ निहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला स्थानिक नेत्यांनी मार्गदर्शन केले. भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी व आमदार कुमार आयलानी यांनी महायुतीतील कोणत्याही पक्षाला उमेदवारी मिळाली. त्याचा प्रचार करायचे असल्याचे सांगितले. बैठकीच्या सुरुवातीलाच वरिष्ठांनी महायुतीतील कोणत्याही नेत्यांच्या विरोधात बोलण्यास मनाई केली होती. मनाई असतांनाही काही कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटातून होणाऱ्या सक्रियेतेचा पाढा वाचण्यात आला. शिवसेनाबाबत पदाधिकारी व बुथ पदाधित्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकारी व बुथ कार्यकर्त्यांची नाराजी तेथेच मोडीत काढली.

भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी व आमदार कुमार आयलानी यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन महापालिकेत होत असलेल्या टेंडर घोटाळ्यावर आरोप केला होता. तसेच शिवसेना शिंदे गटाचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अरुण अशांन यांच्यावर आरोप केले. त्यानंतर अरुण अशान यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप पदाधिकार्यांची कोंडी केली. या आरोप-प्रत्यारोपाने शिवसेना-भाजपातील वाद चव्हाट्यावर आला. दरम्यान २ फेब्रुवारी रोजी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणपूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. याप्रकारावरून शिवसेना व भाजपातील वाद चव्हाट्यावर आला. गोळीबार प्रकरणी भाजपचे कार्यकर्ते पोलिसांच्या टार्गेटवर आल्याने, त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. याच नाराजीचा बांध टॉउन हॉल येथील बुथ बैठकीत फुटला. बुथ पदाधिकार्यांनी शिवसेना बाबत नाराजी व्यक्त केली असलीतरी, पक्षाच्या आदेशानुसार सर्वांना महायुतीच्या उमेदवाराचे काम करावे लागणार आहेत. असे शहरजिल्हाध्यक्ष रामचंदानी म्हणाले.  शिवसेना व भाजप अंतर्गत घुमशान कल्याण लोकसभा क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना व भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांत गोळीबार प्रकरण व महापालिका टेंडर घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोपाचे क्षेत्र रंगले. तसेच अंतर्गत धुमशान असून लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली.

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाड