शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जादा परतावा देण्याच्या अमिषाने महिलेने घातला चार लाखांचा गंडा

By जितेंद्र कालेकर | Updated: April 5, 2023 15:28 IST

वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: कंपनीची व्यवस्थापक असल्याची केली बतावणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: व्हर्स ग्लोबल डिजिटल कंपनीची व्यवस्थापक असल्याची बतावणी करुन काही वस्तू विकत घेतल्यास त्यावर जादा परतावा देण्याचे अमिष दाखवून एका अनोळखी महिलेने ठाण्यातील विनित शिंदे (४३, रा. वर्तकनगर, ठाणे) यांना तीन लाख ९५ हजारांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी दिली.

    वर्तकनगर येथील रहिवाशी शिंदे यांना १ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३.२० ते २ एप्रिल रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या दरम्यान एका अनोळखी महिलेने आधी व्हर्स ग्लोबलची व्यवस्थापक असल्याचे सांगितले. नंतर नोकरी हवी आहे का? अशी व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज पाठवून विचारणा केली. त्यानंतर लिंक पाठवून अभिप्राय देण्यासाठी गळ घातली. त्याचवेळी कंपनीचे प्रोडक्ट विकत घेण्यास सांगून त्यावर अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. नंतर त्यांच्या बँक खात्यातून तीन लाख ९५ हजारांची रक्कम इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करुन परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत शिंदे यांनी केलेल्या दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात महिलेविरुद्ध ४ एप्रिल २०२३ रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक तिडके हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी