शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पालघरमध्ये महाविकास आघाडीने दिला सत्ताधाऱ्यांना धक्का, ५१ ग्रामपंचायतींसाठी जाेरदार लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 12:17 IST

डहाणू, तलासरी तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने २५ पैकी १७ जागा जिंकल्या. 

- हितेन नाईक

पालघर : शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप या सत्ताधारी आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का देत विरोधकांनी ५१ ग्रामपंचायतींपैकी २५ जागा जिंकल्या. जिल्ह्यात ठाकरे गटाने ९, महाविकास आघाडीने २, सीपीएमने ९, बविआने ५, राष्ट्रवादीच्या पवार गटाने ४, भाजपने १०, शिवसेना शिंदे गटाने ४, मनसेने एक, अपक्षांनी एक, स्थानिक आघाडीने ३ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला. डहाणू, तलासरी तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने २५ पैकी १७ जागा जिंकल्या. ५१ ग्रामपंचायती, तर ४९ पोटनिवडणुका होत्या. ५१ ग्रामपंचायतींपैकी सफाळेजवळील शेलटे ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, तर टेंभिखोडावे ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यात पश्चिम किनारपट्टीवर ठाकरे गटाने माहीम, शिरगाव, सालवड, मासवन, कपासे, आदी ९ ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व राखले. अन्य दोन जागा जिंकून भाजपला धक्का दिला. या तालुक्यात १६ ग्रामपंचायतींपैकी ९ उद्धव ठाकरे गट, तीन बहुजन विकास आघाडी, एक शिवसेना शिंदे गट, दोन महाविकास आघाडीने जिंकल्या.

तलासरीत माकपचे वर्चस्व कायमडहाणू तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींपैकी ४ भाजप, ४ शिवसेना ठाकरे गट, ४ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ३ राष्ट्रवादी, एक मनसे आणि एक अपक्षांनी जागा जिंकल्या. तलासरी तालुक्यातील एकूण ८ पैकी ५ ग्रामपंचायती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिंकल्या, तर भाजपला ३ जागांवर समाधान मानावे लागले. जव्हार तालुक्यात शिंदे गट व भाजपने युती करीत एक जागा जिंकून घेतली. विक्रमगड तालुक्यात एक जागा शिवसेना शिंदे गट आणि एक जागा भाजपने जिंकली. वसई तालुक्यात एकूण ३ जागांपैकी एक भाजप आणि दोन बहुजन विकास आघाडीने जिंकल्या, तर मोखाडा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेना शिंदे गट, एक भाजप आणि एक राष्ट्रवादीने जिंकली.

आमदारांसह पदाधिकाऱ्यांचे अपयशशिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांना कवाडा ग्रामपंचायत राखण्यात अपयश आले. तेथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विजय मिळविला. शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्या माहीम आणि शिरगाव या दोन्ही महत्त्वपूर्ण ग्रामपंचायती ठाकरे गटाने जिंकून जोरदार धक्का दिला. याच गटाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आणि विद्यमान सदस्या वैदेही वाढाण यांच्या सालवड ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने वर्चस्व राखले. शिरगाव ग्रामपंचायतीवर भाजपचे नेते विनोद तावडे, रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती सुजित पाटील यांचाही पराभव झाला.

टॅग्स :palgharपालघरgram panchayatग्राम पंचायत