शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मिरा भाईंदरमध्ये '७० पार'चा नारा भाजपने केला खरा; आ. नरेंद्र मेहतांची मंत्री सरनाईकांवर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 08:04 IST

Mira Bhayander Municipal Election Results 2026: विकासकामे, विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यात शिंदेसेना अपयशी; जनसंपर्क न वाढविल्याचा बसला फटका

Mira Bhayander Municipal Election Results 2026: मिरा भाईंदर पालिका निवडणुकीत भाजपने सत्ता राखलीच नाही, तर शिंदेसेनेला भुईसपाट करून आपला ७० पारचा नारादेखील खरा करून दाखवला. शिंदेसेनेचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पानिपत केले. 

मिरा भाईंदरमध्ये गेल्या काही वर्षात मंत्री सरनाईक यांनी विकासकामांसह शिंदेसेना वाढवण्यावर भर देत बरेच नगरसेवक पक्षात घेतले. शहरात त्यांनी स्वतःचे वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या विकासकामे, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व विविध समाजांना सोबत जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरनाईकांसह शिंदेसेनेच्या पदाधिकारी - शिवसैनिकांना ही कामे आणि कार्यक्रम हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे जमले नाही. लोकांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला गेला नाही. पदे वाटली. मात्र, पक्ष संघटनांची बांधणी आणि सक्रियपणे तळागाळात काम करणारे कमी होते. सर्व काही मंत्री सरनाईक यांच्यावरच अवलंबून होते. उद्धवसेनेच्या स्थानिक नेत्यांना भाजपकडून रसद दिली जात असल्याची व शिंदेसेनेच्या मराठी प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्ये उद्धवसेना व मनसे उमेदवारांचा फटका बसेल याची कल्पना सरनाईक यांना आली होती. मात्र, त्यावर उपाय करण्यात ते आणि प्रस्थापित उमेदवार कमी पडले.

मराठी मुद्द्याचाही परिणाम

मेहतांनी उमेदवारी देताना त्यांचे विरोधक व नको असलेल्यांना बाजूला केल्याने अनेक माजी नगरसेवक- पदाधिकारी यांनी बंडखोरी व नाराजी व्यक्त केली; परंतु त्यांनी भाजपाची संघटन शक्ती व नियोजनासह बूथ स्तरापर्यंतच्या मतांची आकडेमोड केली. शिवाय दोन्ही ठाकरे बंधूंच्या मराठीच्या मुद्द्याचा विपरीत परिणामदेखील शहरातील भाजपच्या पारंपरिक राजस्थानी, गुजराती, उत्तर भारतीय, जैन आदी मतदारांवर पडल्याचा भाजपला फायदा झाला. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा फायदा मेहतांनी पुरेपूर उचलला आणि शिंदेसेनेला नमवले. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's '70 Plus' Slogan Achieved in Mira Bhayander; Mehta Defeats Sarnaik

Web Summary : BJP retained power in Mira Bhayander, exceeding expectations. Narendra Mehta outmaneuvered Pratap Sarnaik. Sarnaik's development efforts and party expansion failed to connect with voters. BJP capitalized on Marathi issues and internal Sena weaknesses, securing victory.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६pratap sarnaikप्रताप सरनाईक