शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही चोरट्यांचा धुमाकूळ, अनेकांचे दागिने चोरीला

By धीरज परब | Updated: March 22, 2023 13:41 IST

पहिल्या दिवशी तर तब्बल ३६ महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेले होते. 

मीरारोड - बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या दर्शनासाठी झालेल्या गर्दीत दुसऱ्या दिवशी देखील चोरट्यांनी धुमाकूळ घालत ८ महिलांच्या गळ्यातील दागिने चोरल. पहिल्या दिवशी तर तब्बल ३६ महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेले होते. 

मीरारोडच्या श्रीकांत जिचकार चौक ( एस के स्टोन चौकी )  जवळील मैदानात बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या दर्शनाचा कार्यक्रम भाजपाच्या वतीने शनिवार १८ मार्च व रविवार  १९ मार्च असा आयोजित केला होता . शनिवारी पहिल्याच दिवशी बाबांच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळली. गर्दीचा फायदा घेऊन १८ मार्च रोजी ३६ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या व मंगळसूत्र असे एकूण ४५० ग्राम  वजनाचे ४ लाख ८७ हजार किमतीचे दागिने चोरीचा गुन्हा मीरारोड पोलिसांनी दाखल केला होता. पोलिसांनी ६ महिला चोरांच्या टोळीला सुद्धा अटक केली होती. 

दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चोरीचा अनुभव पाहता पोलीस व आयोजक प्रभावी बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवतील अशी अपेक्षा होती. मात्र रविवारी देखील चोरटयांनी पोलिसांना न घाबरता आपली हात सफाई केली. सोमवारी मीरारोड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार ८ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळ्या असा एकूण १५० ग्रॅम वजनाचा व १ लाख ४३ हजारांचा ऐवज चोरण्यात आल्याचे नमूद केले आहे.  दोन दिवसात बाबांच्या दर्शन कार्यक्रमात आलेल्या एकूण ४४ महिला भाविकांचे दागिने चोरीला गेले आहेत. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम