शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

मर्जीतील नगरसेवकांनाच दिली महत्त्वाची पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 00:32 IST

मीरा-भार्इंदर महापालिका : भाजपमध्ये नाराजीचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भार्इंदर मनपात ठरावीक मर्जीतील नगरसेवकांना महत्त्वाची पदे दिली जात असल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. तर, माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांना महत्त्वाची पदे मिळत असल्याने त्यांचे पक्षातील वजन कायम असल्याचे मानले जात आहे.उपमहापौरपदी मेहता समर्थक हसमुख गेहलोत यांची वर्णी लावली. गेहलोत हे भाजपचे गटनेते आहेत. शिवाय, स्थायीचे सदस्यही आहेत. भाजपमध्ये एका व्यक्तीला एक पद असे धोरण असले, तरी गेहलोत यांना मात्र एकाचवेळी दोन महत्त्वाची पदे आणि स्थायी समिती सदस्यत्व अशी खैरात पक्षाने केली आहे.सभागृह नेतेपदी ज्येष्ठ भाजप नगरसेवक रोहिदास पाटील यांना बाजूला करून नगरसेवक प्रशांत दळवी यांची नियुक्ती केली गेली. त्यावेळी पाटील यांना पूर्वकल्पनाच देण्यात आली नाही. स्वत:च्या जागी दळवींची नियुक्ती झाल्याचे कळल्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.दळवी हे शिवसेना सोडून भाजपमध्ये आले असले, तरी ते मेहता यांचे कट्टर समर्थक आहेत. अडीच वर्षांत दळवींना पाणीपुरवठा आणि मलनि:सारण समितीचे सभापतीपद दिले. स्थायीचे सदस्यही त्यांना केले. आता सभागृह नेतेपदी त्यांची वर्णी लावून मेहतांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिलेला धक्का मानला जातो.जिल्हाध्यक्ष म्हणतात यावर नंतर बोलू...भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. सुरेश येवले म्हणाले की, शहरात भाजपला नेहमीच स्वत:च्या मर्जीतल्या कंपनीप्रमाणे काहींनी राबवले आहे. त्यामुळे पक्षापेक्षा त्यांच्या मर्जीतील लोकांना महत्त्वाची पदे दिली जात आहेत. गेहलोत यांना उपमहापौर, गटनेते आणि स्थायी समिती सदस्य, अशी तीन पदे दिली आहेत. तर, दळवींना दुसऱ्या प्रभागातून तिकीट दिले. पाणीपुरवठा समिती सभापती केले. अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा मेहतांनी पळून जाण्यास दळवी यांचीच गाडी वापरली होती. पोलिसांनी नंतर ती जप्त केली. सभागृह नेतेपद त्याची बक्षिसी आहे का, असा सवाल येवले यांनी केला आहे. याप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी या विषयावर आपण नंतर बोलू असे सांगितले.