शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
4
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
6
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
7
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
8
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
9
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
10
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
11
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
12
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
13
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
14
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
15
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
16
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
17
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
18
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
19
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

पर्यावरणाच्या जनजागृतीपेक्षा गरज आहे ती अंमलबजावणीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:29 IST

डॉ. जितेंद्र रामगावकर यांचे मत : ठाण्यात ‘आपलं पर्यावरण’ पर्यावरणीय लघुचित्रपट महोत्सव ; १५० पर्यावरणप्रेमींनी लावली उपस्थिती

ठाणे : विविध माध्यमांतून, कार्यक्रमांद्वारे पर्यावरणाविषयी जनजागृती खूप झाली आहे. त्यामुळे आता जनजागृतीपेक्षा गरज आहे ती अंमलबजावणीची. पर्यावरणपूरक प्रत्येक गोष्टीची तत्काळ अंमलबाजवणी व्हावी जेणेकरून पर्यावरण वाचवू शकू, असे मत ठाणे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केले.

पर्यावरण दक्षता मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आपलं पर्यावरण’ पर्यावरणीय लघुचित्रपट महोत्सव शनिवार आणि रविवारी एकूण तीन सत्रांत हनुमान व्यायामशाळा, शिवसमर्थ विद्यालय, गडकरी रंगायतन समोर, ठाणे येथे पार पडले. या महोत्सवात सुमारे १५० पर्यावरणप्रेमींनी उपस्थिती दर्शवली. महोत्सवाचे उद्घाटन रामगावकर यांच्या हस्ते उंबराचे झाड लावून झाले. यावेळी ट्रेझर्ड वेटलँड आॅफ ठाणे, दि ज्वेल्स आॅफ ठाणे क्रि क, ट्रान्सफॉर्मर आॅफ एनर्जी , साद, लाईफ आॅन सी शोअर, सुनो सासे क्या केहती है, नमामि गंगे, देवराई, वाइल्ड लाईफ कंजर्वेशन, लाईफलाईन मिट्स लाईफ, कॅरी आॅन, पवित्र उपवन, तहान, वेकअप, ठाणे

क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य, मी सायकल बोलतेय, नागझिरा, अस्वस्थ उज्जैनी, अंकुर थीम पार्कहे चित्रपट दाखवण्यात आले. यावेळी प्रसाद दाते, प्रा. विद्याधर वालावलकर, डॉ. प्रसाद कर्णिक, डॉ. पुरु षोत्तम काळे, संगीता जोशी तसेच या महोत्सवात दाखवल्या गेलेल्या चित्रपटांचे निर्माते - मोनाली शाह, अमोल कचरे, उमाकांत निखारे, चैतन्य किर, डॉ. पूनम कुर्वे, राज बांगर, आणि मिलिंद पाटील उपस्थित होते. तसेच, पर्यावरण दक्षता मंडळाचे ग्रीन शॉपी, देवराई, निसर्गायण या प्रकल्पांचे सादरीकरण यानिमित्ताने करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिवस-२०१९ च्या ‘बीट एअर पोल्युशन’ या संकल्पनेला अनुसरून रविवारी सकाळी गडकरी रंगायतन समोर पर्यावरण दक्षता मंडळातर्फेएक जनजागृतीपर अभियान राबवण्यात आले.या अभियानामध्ये सुमारे ३५ पर्यावरणप्रेमींनी नाकाला मास्क लावून हवाप्रदूषणाच्या विरु द्ध जनजागृतीचे काम केले. यामध्ये जास्तीत जास्त भारतीय वृक्षलागवड, नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर, हवाप्रदूषण कमी करण्यासाठी सायकलचा वापर करणे, विजेचा तसेच पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्याचा यावेळी संकल्प करण्यात आला.प्रा. वालावलकर यांनी लोकांना हवाप्रदूषण आणि पर्यावरण यांची ओळख करून दिली तसेच पर्यावरणसासाठी जनजागृती करण्याचे आवाहन यानिमित्ताने केले. या कार्यक्र माचे सूत्रसंचालन सुरभी वालावलकर, चित्रा म्हस्के, पौर्णिमा शिरगावकर यांनी केले. 

टॅग्स :environmentवातावरणthaneठाणे