शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ओखी वादळाचा परिणाम : उत्तनच्या मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:30 IST

मासेमारीच्या ऐन हंगामात ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उत्तन, पाली, चौक आदी भागांतील मच्छीमारांचे नुकसान काही कोटींच्या घरात गेले आहे.

धीरज परब मीरा रोड : मासेमारीच्या ऐन हंगामात ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उत्तन, पाली, चौक आदी भागांतील मच्छीमारांचे नुकसान काही कोटींच्या घरात गेले आहे. मासेमारी सोडून किनाºयावर परतावे लागले, तर काहींना जाताच न आल्याने खलाशांचा पगार, डिझेल, बर्फ आदी खर्च अंगावर पडलाच. शिवाय, मासेमारीच करता न आल्याने मच्छीमारांचे दुहेरी नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानभरपाई देण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.भार्इंदरच्या उत्तन, पाली, चौक आदी किनारपट्टी परिसरात सुमारे ७५० मासेमारी बोटी आहेत. मासेमारी हाच उपजीविकेचा मुख्य व्यवसाय असलेल्या मच्छीमारांना सध्या मासेमारीचा चांगला हंगाम मिळाला होता. ४ डिसेंबरला हवामान खात्याने ओखी चक्रीवादळाचा धोक्याचा इशारा देत पुढील ७२ तास समुद्र खवळलेला राहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये तसेच मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना परत बोलावण्याचा इशारा दिला होता. ठाणे जिल्हा प्रशासनानेही तशी माहिती पोलीस, पालिकेला दिली होती.अनेक मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. तर, अनेक बोटी जायच्या तयारीत होत्या. धोक्याच्या इशाºयानंतरही खोल समुद्रात गेलेल्या बोटी ४ डिसेंबरला सायंकाळपर्यंत सुखरूप किनारी आल्या. तर, अनेक बोटी वादळाच्या इशाºयामुळे समुद्रात गेल्याच नाहीत. पोलीस, महसूल व मत्स्य विभागाने ओखी वादळाचा इशारा मिळताच दिवसरात्र बोटींशी संपर्क साधून त्यांना माघारी फिरायला लावल्याने बोटींचे नुकसान वा जीवितहानी झाली नाही. परंतु, मासेमारी बुडाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.मासेमारीसाठी खोल समुद्रात जाताना इंधन, बर्फ, किराणा आदीसाठी मोठा खर्च प्रत्येक बोटीला येतो. शिवाय, खलाशांना त्यांचा पगार द्यावा लागतो. त्यामुळे हा सर्व खर्च भरून काढत त्यावर उत्पन्न मिळवायचे म्हटले की, मासेमारी केली पाहिजे व मासेही मिळाले पाहिजेत. परंतु, ओखी वादळामुळे समुद्रात गेलेल्या मच्छीमार बोटींना मासेमारी न करताच मागे फिरावे लागले. त्यामुळे मासे तर मिळाले नाहीतच, शिवाय इंधन, बर्फ, किराणा, खलाशांचा पगार यांचा खर्चही वाया गेला. तर, मासेमारीसाठी जाण्याच्या तयारीने निघालेल्या बोटींनाही अशाच प्रकारे नुकसान सोसावे लागले आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ