शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनीप्रदूषणात गणेशमूर्तीचे विसर्जन, १०० डेसिबल आवाजाची पातळी ओलांडली

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 5, 2022 22:09 IST

निवासी परिसरात आवाजाने गाठली १०० डेसिबलची पातळी

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत गणेशोत्सव काळात आवाजाची पातळी कमी झाली होती. या वर्षी मात्र आवाज पुन्हा वाढला असून ध्वनी प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवत गणेशमुर्तींचे विसर्जन करण्ायात आले. राम मारुती रोड या निवासी परिसरात रात्री १०. ४५ च्या सुमारास आवाजाची पातळी १०० डेसिबलपर्यंत गाठली. ढोलताशा, बेंजो, डीजे आणि अन्य ध्वनी यंत्रणेच्या आवाजाचा गोंधळ रात्री दहा वाजल्यानंतरही असल्याचे निरीक्षण पर्यावरण अभ्यासक डाॅ. महेश बेडेकर यांनी नोंदविले.

ध्वनीप्रदूषणाबाबत न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. परंतू दीड दिवस आणि त्यानंतर रविवारी झालेल्या पाच दिवसांच्या गणेशमुर्तींच्या विसर्जनावेळी ठाणे शहरात कमी झालेला आवाज पुन्हा वाढला. निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले परंतू गणेशोत्सव काळात आवाजाची वाढलेली पातळी पाहता ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. पाच दिवसांच्या गणेशमुर्तींच्या विसर्जनावेळी झालेले ध्वनीप्रदूषण हे दीड दिवसांच्या गणेशमुर्तींच्या विसर्जनावेळी झालेल्या ध्वनीप्रदूषणाच्या तुलनेने अधिक असल्याची माहिती डॉ. बेडेकर यांनी दिली. दीड दिवसांच्या गणेशमुर्तींच्या विसर्जनावेळी देखील ९० - ९५ डेसिबल पर्यंत आवाजाची पातळी गेली तर रविवारी चक्क आवाजाच्या पातळीने शंभरी गाठली. यंदा दीड आणि पाच दिवसांच्या गणेशोत्सव काळात विशेषत: विसर्जन मिरवणूकीदरम्यान ध्वनीप्रदूषणाचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आले. डॉ. बेडेकर यांनी विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावरील आवाजाच्या पातळीची नोंद केली. दोन्ही दिवशी आवाजाची पातळी ही ८५,९०,९५,१०० या डेसिबलच्या घरात असल्याचे आढळून आले.  विसर्जन मिरवणूकीदरम्यान ध्वनीप्रदूषणाच्या नोंदी

राम मारुती रोड : रात्री ८.३० - ९० ते ९५ डेसिबल                         रात्री १०.४५ : ९५ ते १०० डेसिबल                         रात्री १२ : ९५ डेसिबलपाचपाखाडी : रात्री ८.४५ : ८५ ते ९० डेसिबलवर्तकनगर : रात्री ९ : ७५ ते ८५ डेसिबलहिरानंदानी इस्टेट : रात्री ७.३० : ८५ ते ९० डेसिबल 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवthaneठाणे