शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काशिमीरा भागात मोठ्या झाडांची बेकायदा कत्तल; पालिकेची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 15:00 IST

काशिमीरा भागातील पांडुरंग वाडी येथील मोठया झाडांची बेकायदेशीर पण कत्तल करण्यात आल्याचा प्रकार

मीरारोड : काशिमीरा भागातील पांडुरंग वाडी येथील मोठया झाडांची बेकायदेशीर पण कत्तल करण्यात आल्याचा प्रकार स्थानिक भाजपा नगरसेविकेने महापालिकेस लेखी तक्रारी द्वारे कळवुन देखील पालिकेकडून गुन्हा दाखल करण्यास टोलवाटोलवी केली जात आहे. कारवाई झाली नाही तर धरणं धरु असा इशारा नगरसेविकेने दिलाय.पेणकरपाड्या जवळ असलेल्या पांडुरंग वाडीत काकड पॅरेडाईज मार्गावर मोठ मोठी हिरवीगार झाडं होती. सोमवारी स्थानिक भाजपा नगरसेविका वीणा भोईर यांना स्थानिक रहिवाशां कडुन येथील मोठी झाडं तोडण्यात येत असल्याची तक्रार आली. भोईर ह्या घटनास्थळी गेल्या असता तेथे झाडं कापण्याच्या कटरने मोठी ७ ते ८ झाडं कापण्यात आल्याचे दिसुन आले. त्या ठिकाणी झाडांच्या लाकडांचे तुकडे करुन ठेवले होते व ते नेण्यासाठी मोठा टॅम्पो देखील होता. भोईर यांनी झाडं कापणारयाांना पालिकेची परवानगी विचारली असता ती दाखवली नाही. भोईर यांनी या प्रकरणी पालिका आयुक्त बी.जी.पवार सह सबंधित अधिकारयांना संपर्क करुन झाडं तोडण्यात आल्याचा प्रकार सांगीतला. दरम्यान झाडं कापणारे मजुर व सबंधित लोकं कटर, टॅम्पो आदी सोडुन पळुन गेले. पालिका आयुक्तांसह उपायुक्त डॉ. संभाजी पानपपट्टे यांना लेखी तक्रार दिली असता पानपट्टे यांनी उद्यान अधिक्षक हंसराज मेश्राम यांना घटनास्थळाची पाहणी करुन चौकशी करा व तत्काळ गुन्हा दाखल करा असे निर्देश देखील दिले. तर मेश्राम यांनी घटनास्थळी पाहणी केली परंतु टॅम्पो, कटर आदी साहित्य जप्त करुन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ चालवल्याचा आरोप वीणा भोईर यांनी केलाय. पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी आमचे मुख्यमंत्री झाडं लावा झाडं जगवा अशी मोहिम राबवत असताना दुसरी कडे अशा मोठमोठ्या डेरेदार झाडांची बेकायदा कत्तल कोणी करत असेल तर कारवाई झालीच पाहिजे असं भोईर म्हणाल्या. उष्णतेच्या झळा आता पासुनच तिव्र होऊ लागल्या असुन थंडाव्यासाठी झाडांची नितांत गरज आहे. शिवाय प्रदुषणकारी कार्बन शोषुन आॅक्सीजन मिळतो. विविध जातीचे पक्षी, जीवांचा निवारा झाडांवर असतो. पर्यावरणासह नागरीकांसाठी झाडं ही उपयुक्त असुन पालिकेने कारवाई केली नाही तर धरणं धरु असा इशारा भोईर यांनी दिलाय.