शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहनचालकांकडून अवैध वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:42 IST

मध्यरात्रीनंतर टोळी सक्रिय : लाखो रुपयांची लूटमार; हप्ता वसुलीचा संशय

धीरज परब

मीरारोड : वरसावे पूल येथील घोडबंदर मार्गावर असलेल्या टोलनाक्याजवळ अवजड वाहनांकडून चक्क पावती देऊन शुल्क वसुली केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अवजड वाहनांकडून एन्ट्रीसाठी पावतीच्या आड केली जाणारी ही मुंब्रा पॅटर्न हप्ता वसुली असण्याचा संशय आहे.

टोलनाक्याच्या ठिकाणी टोल भरून अवजड वाहने पुढे सरकताच एक खासगी टोळी हातात पिवळ्या रंगाच्या पावत्या घेऊन उभी असते. सदर टोळी अवजड वाहनांना अडवते व त्यांच्याकडे ८०० रुपये जबरदस्तीने देऊन त्यांना पावती दिली जाते. रोज मध्यरात्रीपासून सकाळी ६ वाजेपर्यंत ही टोळी पावती वसुली करतेय. ज्यांच्याकडे पावती असेल तर त्यांनाच सोडले जाते.रविवारी मध्यरात्रीनंतर प्रस्तूत प्रतिनिधीने पाहणी केली असता टोल नाक्यालगत तिघेजण रस्त्यात उभे राहून अवजड वाहने थांबवून पिवळ्या रंगाच्या पावती पुस्तकाद्वारे पैसे वसुली करताना दिसले. त्यांच्यासाठी अनोळखी असलेल्या ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला पाहून त्यांनी पावत्या फाडणे लगेच बंद केले. त्यातील एका इसमास विचारणा केली असता त्याने आपण टोलनाक्याचा कर्मचारी असल्याचे सांगून तो टोल नाक्याकडे गेला. त्यापैकी एकजण दुभाजकावर बसून मोबाइल पाहू लागला. कडेला एक क्रेन उभी होती, तर दुभाजकाजवळ दुचाकीस्वार बराच वेळ होता. तो पोलीस असल्याचे वाटत होते.

एका वाहनाकडून ८०० रुपयेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पावती ही क्रेन सर्व्हिसची फाडली जाते. प्रत्येक अवजड वाहनांकडून ८०० रुपये घेऊन पावती दिली जाते. रोज सुमारे २५० ते ३०० वाहनांकडून ही वसुली केली जाते. महिन्याची एन्ट्री फी याआड सदर वसुली होते. महिन्याचे लाखो रुपये गोळा केले जातात. मुंब्रा बायपासवरदेखील रात्रीच्या वेळी क्रेनची ८०० रुपयांची पावती देऊन वसुली केली जात असल्याचे उघडकीस आले होते.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस