शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याला बेकायदा मोबाइल टॉवरचा विळखा; कारवाई केल्यास नेटवर्क खंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 15:28 IST

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील विविध कंपन्यांच्या ७७१ मोबाइल टॉवरपैकी केवळ ६३ टॉवर अधिकृत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली ...

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील विविध कंपन्यांच्या ७७१ मोबाइल टॉवरपैकी केवळ ६३ टॉवर अधिकृत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे उर्वरित टॉवरबाबत पालिका काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. समजा हे अनधिकृत टॉवर हटवण्याचा निर्णय घेतला तर ठाणे शहरातील कोट्यवधी मोबाइल ग्राहकांना त्याचा फटका बसेल. याच अपरिहार्यतेचा गैरफायदा मोबाइल कंपन्यांनी उठवला आहे.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेत शहरातील अनधिकृत मोबाइल टॉवरचा विषय चांगलाच गाजला होता. शहरात मोबाइल टॉवर उभारले जात असले तरी त्यापोटी पालिकेला महसूल मिळत नसल्याचा दावा लोकप्रतिनिधींनी केला होता. शहरात किती टॉवर अधिकृत आणि किती अनधिकृत या बाबतची माहिती पालिकेकडे नसल्याचे दिसून आले होते. यावरून सभागृहात वादंग झाला होता.

ठाणे शहराला बेकायदा होर्डिंग्ज आणि मोबाइल टॉवरचा वेढा पडला असून महापालिकेतील काही अधिकारी आणि बेकायदा टॉवर कंपन्यांमध्ये असलेल्या साटेलोट्यामुळे शहरात मोबाइल टॉवरची संख्या वाढत आहे. शहरातील ७७१ मोबाईल टॉवरपैकी फक्त ६३ टॉवर हे अधिकृत असून ७०८ म्हणजे ९९ टक्के टॉवर हे बेकायदा आहेत. मालमत्ताकराच्या वसुलीत ही आकडेवारी उघडकीस आली असून मोबाईल टॉवर्ससाठी ठामपाची नियमावली ही निव्वळ फसवणूक असल्याचे यातून स्पष्ट झाले.

ठामपा आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वीच शहरातील बॅनरवर कारवाई केली. शहरातील बेकायदा मोबाईल टॉवर्सवर ते कधी कारवाई करणार, असा सवाल आता उपस्थित केला आहे. देशातल्या मोठ्या कंपन्यांनी हे टॉवर्स उभे केले असल्यामुळे त्यावर कोणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. त्याचबरोबर टॉवरवर कारवाई केली तर लोकांचे मोबाइल फोन बंद होतील व गहजब होईल, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळेच कंपन्यांचे फावले आहे.

धोकादायक इमारतींवरही टॉवर- अनेक टॉवर सरकारी जमिनीत घुसखोरी करून उभे केले असून ५० टक्के टॉवरच्या जमिनी कोणाच्या मालकीच्या आहेत, त्यांच्या परवानगीचाही पत्ता नाही. अनेक टॉवरच्या रेडीएशनचा त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

- अनेक टॉवरच्या परवान्यांचे १० वर्षे नूतनीकरण झालेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, वन जमीन, खाडी आणि येऊर सारख्या सॅटेलाईट स्टेशनजवळील भागातही अनेक टॉवर उभे आहेत. काही टॉवर चक्क धोकादायक इमारतींवर आहेत.

टॅग्स :Mobileमोबाइलthaneठाणे