शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीसह अवैध बांधकामे होणार अधिकृत, शासनाचा अध्यादेश

By सदानंद नाईक | Updated: March 14, 2024 20:06 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील बांधकामे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्याची माहिती शहर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. शासनाने याबाबत जीआर काढला असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी यावेळी दिली.

- सदानंद नाईक उल्हासनगर - शहरातील बांधकामे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्याची माहिती शहर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. शासनाने याबाबत जीआर काढला असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी शहरातील विकास कामात भ्रष्टाचार चालला असल्याचा आरोप केल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

उल्हासनगरात धोकादायक इमारती पडून अनेक जणांचे जीव गेले असून शेकडो जण जखमी झाले. तसेच हजारो नागरीक बेघर झाले असून घर देता का घर असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहरातील तब्बल २७ हजार बांधकामे नियमित होणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदिप पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, माजी जिल्हाध्ययक्ष जमनुदास पुरस्वानी, लाल पंजाबी, चार्ली पारवानी, राजेश वधारीया, प्रकाश नाथानी आदीजन पत्रकार परिषद घेऊन शासनाने काढलेल्या अध्यादेशाची माहिती दिली. यावेळी आमदार आयलानी यांनी शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगून शहरातील धोकादायक इमारती व अवैध बांधकामे नियमित होणार असल्याची माहिती दिली.

शहरातील बांधकामे नियमित करण्यासाठी सध्याच्या रेडिरेकनरच्या १० टक्के रक्कम भरावे लागणार असल्याचे आमदार आयलानी म्हणाले. तसेच क्लस्टरचे धोरण शहरासाठी बदलण्यात आले असून १० चौ.मी. ऐवजी ४ हजार चौ.मी क्षेत्रफळ ठेवण्यात आले असून त्यामध्ये भविष्यात येणारे अडथळे दूर करण्यात येणार असल्याची माहितीही आयलानी यांनी दिली. भाजपच्या उपस्थित स्थानिक नेते माहिती देत असतांना पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी शहरातील भ्रष्टाचाराबाबत बोलायचे आहे. असे म्हणून बोलण्यास लागताच, त्यांची इतर नेत्यांकडून समजूत काढण्यात आली आहे.

भाजपातील वाद चव्हाट्यावर भाजपची पत्रकार परिषद सुरू असताना पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी शहरात सुरू असलेल्या विकास कामात भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. मात्र पत्रकार परिषदेत त्यांना इतर नेत्यांनी बोलण्यापासून रोखून त्यांची समजुत काढली. याप्रकाराने भाजपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा