शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

उल्हासनगरातील बेकायदा बांधकामे नियमित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:44 PM

तज्ज्ञांची समिती स्थापन, अध्यादेशानुसार कामास सुरूवात

उल्हासनगर : राज्य सरकारच्या नोटीफिकेशननंतर बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने तीन तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. यापूर्वी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी व वर्गवारी समिती सदस्य करणार असून नवीन प्रस्ताव मागविणार असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली. यामध्ये धोकादायक व ३० वर्ष जुन्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे.उल्हासनगरमधील ८५५ बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला एका जनहित याचिकेद्बारे दिले होते. या आदेशाने शहरात खळबळ उडाली. महापालिकेने कारवाई सुरू करताच शहरात एकच हाहाकार उडाला. अखेर राज्य सरकारने विस्थापितांचे शहर म्हणून काही अटीनुसार २००५ पूर्वीची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेवून खास उल्हासनगरसाठी अध्यादेश काढला. अध्यादेशानुसार महापालिकेने बांधकामे नियमित करण्यासाठी सरसकट सर्वच बांधकामांना नोटिसा देवून बांधकामे नियमित करण्याचे आवाहन करण्यात आले. २२ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी प्रस्ताव नेमलेल्या समितीकडे सादर केले. मात्र तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांना वेळ मिळाला नसल्याने, १३ वर्षात फक्त १०० बांधकामे नियमित झाली.शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे धाव घेत इमारत पुनबांधणीची मागणी केली. यातून तोडगा काढण्यासाठी सरकारने १६ सप्टेंबर रोजी नोटीफिकेशन काढून धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीला हिरवा झेंडा दाखवला. तसेच एका आठवडयात पुन्हा दुसरे नोटीफिकेशन काढून धोकादायक इमारतीसह ३० वर्ष जुन्या इमारत पुनर्बांधणीसाठी चार चटईक्षेत्र दिले. सरकारच्या निर्णयाने हजारो नागरिकांना दिलासा मिळाला असून ठप्प पडलेल्या अध्यादेशाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.आयुक्त देशमुख यांनी तज्ज्ञांची समिती स्थापन केली असून यापूर्वी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची वर्गवारी करून छाननी करण्यात येणार आहे. तसेच २००५ पूर्वीचे बांधकामे नियमित करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येणार आहे.समिती घेणार प्रस्तावाचा आढावामहापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी तीन सदसीय समिती स्थापन करून नगररचनाकार मिलिंद सोनावणी, अग्निशमन दलाचे अधिकारी भास्कर मिरपगारे व वास्तूविशारद अनिरूध्द वाखवा यांची नियुक्ती केली आहे. नाखवा ऐवजी दुसरा वास्तूविशारद कंत्राटदार घेण्याची मागणी होत आहे. तसेच प्रभाग समितीनुसार समिती स्थापन करण्याची मागणी होत असून तसे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका