शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये बेकायदा बांधकामांना ऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 00:08 IST

उल्हासनगर शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाल्यामुळे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मदन सोंडे यांनी बुधवारी आझादनगर येथील मंडलिक चौकातील बांधकामांची पाहणी केली.

उल्हासनगर - शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाल्यामुळे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मदन सोंडे यांनी बुधवारी आझादनगर येथील मंडलिक चौकातील बांधकामांची पाहणी केली. उपायुक्तांच्या पाहणीने भूमाफियांचे धाबे दणाणले असून अद्यापही महापालिकेने कारवाई केलेली नाही.उल्हासनगरमध्ये बेकायदा बांधकामाच्या असंख्य तक्रारी आयुक्त व उपायुक्त यांच्याकडे येऊन याविरोधात पालिकेसमोर उपोषण झाले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सोंडे यांनी काही बेकायदा बांधकामांची पाहणी केली असता, आरसीसी बांधकामाचे मजले उभे राहिलेच कसे? असा प्रश्न पडला. पाहणीनंतर त्यांनी बेकायदा बांधकामांवरील कारवाईचे स्पष्ट आदेश दिले. तसेच याबाबत महापालिकेला माहिती कशी नाही, असा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना केला. आझाादनगर मंडलिक चौक, पंजाबी कॉलनी, राम मॉलिशवाला परिसर, कॅम्प नं-२ झुलेलाल मंदिर, सोनारगल्ली यांच्यासह कल्याण ते बदलापूर मुख्य रस्ता आदींसह शहरातील विविध ठिकाणी बेकायदा बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत.महापालिका बेकायदा बांधकामांच्या विरोधात विशेष मोहीम उघडणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे गणेश शिंपी यांनी सांगितले.लोकप्रतिनिधी यांचे नातेवाईक, जवळचे कार्यकर्ते बेकायदा बांधकाम सर्रासपणे करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या हस्तेक्षपामुळे कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार ज्योती कलानी यांच्या निधीतून बांधण्यात येत असलेल्या स्वच्छतागृहाच्या जागेवर व समाज मंदिराच्या जागेवर तीन मजली बेकायदा बांधकामे झाली कशी? अशी तक्रार कलानी यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती.माजी आमदारांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविणारे अधिकारी सामान्य नागरिकांसोबत कसे वागत असतील असे कलानी म्हणाल्या. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करणार असल्याचे कलानी यांनी पत्रकारांना सांगितले.महापालिका उद्यानावरबांधकाम परवाना?शहरातील खुल्या जागा, आरक्षित भूखंड यांच्यासह पालिकेच्या उद्यानांवर बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कोटयवधींची जागा भूमाफियांच्या घशात घातली जात आहे. यामुळे शहर बेकायदा बांधकामांचे माहेरघर बनले असून आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त मदन सोंडे व अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, बेकायदा बांधकामाची सहायक आयुक्त भगवान कुमावत पाहाणी करत असताना मनोज मोरे याने शिवीगाळ केली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे