शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बेकायदा कमानी, जाहिरातफलकांना संरक्षण; मीरा-भाईंदर महापालिकेकडून नियमांची पायमल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 00:38 IST

लोकप्रतिनिधींना आपल्याच ठरावाचा विसर

मीरा रोड : बॅनरमुक्त शहराच्या स्वत:च केलेल्या संकल्पनेला लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने हरताळ फासला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही शहरात बेकायदा कमानी आणि बॅनरबाजीला ऊ त आला आहे. या बॅनरबाजीला महापालिकेचेच संरक्षण मिळत आहे. तर, रस्ते अडवून उभारलेल्या मंडपांना पालिका-पोलिसांकडून अभय मिळत असल्याने त्यावरही कोणतीच कारवाई केलेली नाही.

कमानी लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. जनता दलाचे मिलन म्हात्रे यांनी कमानी व बेकायदा बॅनरविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली होती. कमानीमुळे रहदारी तसेच वाहतुकीला होणारा अडथळा हे बंदीचे एक प्रमुख कारण आहे. बेकायदा जाहिरातफलकही लावण्यास बंदी असून कायद्याने गुन्हा आहे. पोलीस उपअधीक्षक नोडल अधिकारी असल्यामुळे महापालिका जबाबदार आहे, तसेच पोलिसांचीही जबाबदारी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महासभेत ठराव करून बॅनरवर बंदी घालण्यात आली होती.

बॅनरमुक्त शहर म्हणून तेव्हा महापौर डिम्पल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, उपमहापौर चंद्रकांत वैती आदींनी स्वत:चे कौतुक करवून घेतले होते. मात्र, शहरात बेकायदा बॅनर व कमानींना महापालिका, पोलीसच संरक्षण देत असल्याचे चित्र आहे.

शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने आ. मेहता यांचे फलक झाडे तसेच अन्य ठिकाणी बेकायदा लावलेले आहेत. बॅनरसह कमानीही लागल्या असून त्यावर आ. मेहता, आमदार प्रताप सरनाईक, महापौर मेहता आदी लोकप्रतिनिधींचे तसेच पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकत आहेत. कृष्णा गुप्ता, प्रदीप जंगम आदींनी अनेक तक्रारी चालवल्या आहेत. आधीच रस्ते अडवून पालिका आणि पोलिसांच्या आशीर्वादाने मंडप उभारले आहेत.

आता शहरात सर्वत्र बेकायदा कमानी आणि बॅनरबाजी चालली असतानाही पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिक्रमण विभागप्रमुख दादासाहेब खेत्रे आणि प्रभाग अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आयुक्तांवरच कारवाईची मागणी माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी केली आहे. आयुक्त बालाजी खतगावकर यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.भाईंदर धक्का बॅनरमुक्त; परिसर झाला स्वच्छ आणि सुंदरशहरात सर्रास बेकायदेशीर बॅनरबाजी, कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्यावर लोकप्रतिनिधींचे फोटो झळकत आहेत. महापालिकाही कारवाईस टाळटाळ करत आहे. त्याचबरोबर काही चांगले बदलही यंदा पाहायला मिळाले आहेत. भार्इंदर पश्चिमेतील धक्का येथे महापालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेच्या ठिकाणी चमको लोकप्रतिनिधी सर्रास बॅनरबाजी करतात. त्यामुळे या परिसराचे विद्रूपीकरण सुरू होते. गतवर्षी यावर टीकेची झोड उठली तसेच तक्रारी झाल्या होत्या. यंदा लोकप्रतिनिधींनी येथील पालिकेच्या मंडप आदी ठिकाणी बॅनर लावलेले नाहीत. पालिका प्रशासनानेही येथे परखड भूमिका घेतली. हा परिसर बॅनरमुक्त आणि सुंदर दिसत आहे. हाच किस्सा इतर ठिकाणीही गिरवावा, अशी नागरिकांनी मत व्यक्त केले.पालिकेच्या प्रभाग अधिकाºयांना बेकायदा कमानी, बॅनर काढून कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पोलीस बीटमार्शलनाही याबाबत सूचना दिलेल्या आहेत. एका ठिकाणची कमान, फलक पोलिसांनी काढले असून अन्य ठिकाणीही कारवाई केली जाईल. - शशिकांत भोसले, पोलीस उपअधीक्षक, भाईंदर विभाग