शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खरे आव्हान तर यापुढेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:27 IST

सध्या कागदावर असलेली कामे प्रत्यक्षात आणणे, अपूर्णावस्थेतील कामांना गती देणे आणि भविष्याचा वेध घेऊन नियोजन करणे, हे गरजेचे आहे.

- अजित मांडकेजगण्यायोग्य शहरांच्या यादीत ठाणे शहराने सहावा क्रमांक प्राप्त केला, त्याबद्दल महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे व ठाणेकरांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. गेल्या काही वर्षांत उभ्या राहिलेल्या कामांचे हे फलित आहे. मात्र, यशाने हुरळून न जाता सध्या कागदावर असलेली कामे प्रत्यक्षात आणणे, अपूर्णावस्थेतील कामांना गती देणे आणि भविष्याचा वेध घेऊन नियोजन करणे, हे गरजेचे आहे.डिजी ठाणे प्रकल्पांतर्गत सुरू केलेले अ‍ॅप, तलावांचे सुशोभीकरण, सायकलपथ, रस्त्यांचे रुंदीकरण, महापालिका शाळांचे आधुनिकीकरण, स्मार्ट सिटीकडे घेतलेली भरारी, दळणवळणाची उपलब्ध केलेली आणि उपलब्ध होऊ घातलेली साधने, यामुळेच ठाणे महापालिकेने जगण्यायोग्य शहरांच्या यादीत सहावा क्रमांक पटकावला आहे. रिमूव्हेबल एनर्जी आणि पाणीविषयक केलेल्या कामांच्या यादीत ठाणे शहराला पहिला क्रमांक मिळाला आहे. परंतु, या यशामुळे हुरळून न जाता पालिकेची जबाबदारी आता वाढली असल्याचे भान राखले पाहिजे. यापुढेही जाऊन जीवनमान उंचावण्याची जबाबदारी वाढवण्याबरोबर इतर क्षेत्रांत मिळालेले मानाचे स्थान टिकवण्याची जबाबदारी पालिकेला पेलावी लागणार आहे.मागील तीन वर्षांत ठाणे महापालिकेने विविध कामे शहरात सुरू केली आहेत. ठाणे महापालिकेची स्वत:ची परिवहनची सेवा सुरू आहे. तिच्या दिमतीला आता १०० इलेक्ट्रिक बसगाड्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार आहेत. ५० तेजस्विनी बसगाड्या उपलब्ध होत आहेत. या जोडीला इतर प्राधिकरणाच्या सेवा महापालिका हद्दीत सुरू आहेत. येत्या काळात ठाण्यात मेट्रो सुरू होणार आहे. त्यामुळे दळणवळणाची सुविधा आणखी सोपी होणार आहे. परंतु, पालिका एवढ्यावरच थांबली नसून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अंतर्गत वाहतुकीसाठी मेट्रोचा पर्याय मांडला आहे. तसेच पीआरटीएस सेवेला चालना देण्यासाठी पालिका कटिबद्ध आहे. जलवाहतुकीची किंवा वॉटर फं्रट डेव्हलपमेंटची सुविधा उपलब्ध करून देणारी ठाणे महापालिका ही सध्या एकमेव महापालिका ठरली आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याची जबाबदारी पेलण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. त्यामुळे ठाणेकरांचा वेळ आणि पैसा या दोहोंची बचत होणार आहे. पहिल्या टप्प्यातील जलवाहतूक वसई-मीरा भार्इंदर -ठाणे कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत, दिवा, भिवंडी, कल्याण आदी मार्गांवर सुरू होणार आहे. तर, चौपाट्यांचे सुशोभीकरण करण्याचे कामही पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. दळणवळणाची उत्तम साधने उपलब्ध होण्यामध्ये रस्त्यांची भूमिका तितकीच महत्त्वाची मानली जाते. आयुक्त जयस्वाल यांनी मागील तीन वर्षांत शहराच्या विविध भागांत रस्ता रुंदीकरण करताना अनेक रस्ते वाहतुकीसाठी सज्ज केले आहेत. यामध्ये पोखरण रोड नं. १, २ आणि ३ या रस्त्यांकडे पाहताच ठाण्याचा चेहरामोहरा बदलल्याचे स्पष्ट दिसते. याशिवाय, मॉडेल रस्ते विकसित करण्यावर भर दिला गेल्याने ठाण्यातील वाहतूकव्यवस्थेला दर्जा प्राप्त झाला आहे. याशिवाय, ठाण्याला आपली एक खास ओळख असावी, म्हणून तीन रंगांत ठाण्याची ओखळ पालिकेने तयार केली आहे. उड्डाणपूल व भुयारी मार्गांची कामे, आयटी पार्कची उभारणी पालिकेने केली आहे.रुस्तमजी येथे एक हब उभारले जात असून त्याठिकाणी नोकºयांची संधी पालिका उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान, ‘फिजिकल, इन्स्टिट्युशनल, सोशल आणि इकॉनॉमिकल’ अशा चार मुख्य निकषांच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. या चार निकषांमधील ‘इन्स्टिट्युशनल’ निकषात गव्हर्नन्स, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, आॅनलाइन सर्व्हिसेस यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त होऊन देशातील सर्वोत्तम प्रशासन प्रणाली राबवणाºया शहरांत ठाणे सरस ठरले. जनतेला लाभदायक प्रशासकीय सेवा पुरवणे, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून संगणकीय प्रणालीचा जास्तीतजास्त उपयोग करणे,तक्रार निवारण प्रणालीत नागरिकांना समाधानकारक उत्तर देणे, अशा विविध गोष्टींचे परीक्षण करण्यात आले. त्यानुसार, पालिकेने अग्रेसर कामगिरी केल्याचेच दिसून आले आहे. विविध स्वरूपांचे अ‍ॅप तयार करून ठाणेकरांना महापालिकेच्या सर्व सेवा त्यावर उपलब्ध करून दिल्या आहेत. डिजी सिटीकार्डच्या माध्यमातून महापालिकेने ठाणेकरांना एकमेकांशी कनेक्ट करताना विविध योजनांचा लाभ ते कसा घेऊ शकतील, यासाठी प्रयत्न केले आहेत. डिजी सिटीकार्डची सेवा देणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. डिजी ठाणे प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका प्रशासन ते नागरिक असा समन्वय साधला जात असून नागरिकांचे जीवनमान उंचावणे, हा या उपक्र माचा उद्देश आहे.स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पालिकेने गरुडझेप घेतली असून ठाणे स्टेशन परिसरात म्हणजे एक हजार एकरामध्ये मासुंदा आणि कचराळी तलाव येत असून त्यांचा कायापालट केला जाणार आहे. तसेच एलईडी लाइट, वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, बहुमजली पार्किंग सुविधा, पूर्वेकडील सॅटीस, सॉफ्ट मोबिलिटीमध्ये पादचारी आणि सायकलसाठी वेगळी मार्गिका, घनकचरा आणि मलनि:सारणाकरिता डिसेंट्रलाइज प्लांट, सौरऊर्जा, पाण्याचे मीटर आदी सुविधांसह इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नव्या रेल्वेस्टेशनचा विकास या माध्यमातून केला जाणार आहे. तीनहातनाक्याजवळील सिग्नल यंत्रणेत बदल, समूह विकास आदींचा समावेश करण्यात आला आहे.महिला व बालकांच्या सुरक्षेसह ठाणेकरांसाठी महत्त्वाची असलेली कामे केली जाणार आहेत. पाणीपुरवठा योजना, एलईडी लाइट्स, सीसीटीव्ही आणि वायफाय सुविधा दिली जाणार आहे. तसेच टीएमटीसाठीचे व्हेअरीज माय बस अ‍ॅप, आॅनलाइन सुविधा ठाणेकरांसाठी, डिजीकार्ड, स्मार्ट मीटरिंग आदींची कामे केली जाणार आहेत.दरम्यान, शहराचा विकास करतानाच, महापालिका शाळांचा विकास करून विद्यार्थ्यांना स्मार्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये विविध स्वरूपाच्या योजना, पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न ई-लर्निंग सुविधा, विद्यार्थ्यांचे स्मार्टकार्ड, स्मार्ट गर्ल योजना आदी राबवण्याचे काम सुरू आहे.परंतु, पालिकेने मिळालेल्या यशामुळे हुरळून न जाता त्यांच्या पुढील आव्हानांचे भान राखणे गरजेचे आहे. सुरू केलेले काही प्रकल्प पालिकेने पूर्ण केले असले, तरी अनेक प्रकल्पांची कामे ही कागदावर आहेत. काही प्रकल्पांचे घोंगडे आजही भिजत पडलेले आहे. स्मार्ट मीटरची योजना अद्यापही मार्गी लागलेली नाही. अंतर्गत मेट्रोवर केवळ कागदोपत्री चर्चा सुरू आहे. डिजी सिटीकार्डला हवी तशी प्रसिद्धी अद्यापही मिळालेली नाही, यासह इतर महत्त्वाच्या बाबींचा विचार करता मिळालेले यश टिकवण्याचे व भविष्यात वाढवण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे