शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

तीन दिवस पाणी नसेल तर कसं जगायचं

By admin | Updated: December 8, 2015 00:29 IST

आजवर पालिकेत नसल्याने भोपर-देसलेपाड्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. बेकायदा चाळी फोफावल्या. आधीच पाण्याचा प्रश्न बिकट होता

मुरलीधर भवार,  डोंबिवलीआजवर पालिकेत नसल्याने भोपर-देसलेपाड्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. बेकायदा चाळी फोफावल्या. आधीच पाण्याचा प्रश्न बिकट होता. आता तो आणखी बिकट होत गेला. आठवड्यातून तीन-तीन दिवस पाणी नसेल, तर सांगा कसं जगायचं... डोळ््यांत पाणी आणून मनातली धगधग व्यक्त करत महिला विचारत होत्या. उन्हाळ्याची तीव्रता सुरू होण्यापूर्वीच दोघांचे जीव गेले आहेत. येत्या सहा-सात महिन्यांत आणखी काय भोगायला लागणार आहे, असा संतप्त प्रश्नही त्यांनी लोकमतच्या माध्यमातून पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना विचारला. निवडणुकीपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या भोपर-देसलेपाडा परिसरात आठवड्यात तीन दिवस पाणी येत नाही. उरलेले चार दिवस कमी दाबाने येते. श्रीसमर्थ कृपा चाळीत राहणाऱ्या प्रमिला अंजारा यांच्या घरी शनिवारी पाणी आले नव्हते. नेव्हीच्या रुग्णालयात कामाला असल्याने त्यांना रविवारी सुटी होती. कपडे धुण्यासाठी त्या नजीकच्या खदाणीवर गेल्या होत्या. त्या वेळी सोबत १८ वर्षांचा मुलगा निखिलही होता. आई कपडे धुताना पाण्यात पडल्याचे पाहताच तिला वाचविण्यासाठी तोही पाण्यात उतरला. पण पोहता येत नसल्याने तो आणि आई दोघेही बुडाले. त्यांच्या मृत्यूला जशी परिसरातील पाणीटंचाई जबाबदार आहे, तसेच त्याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही जबाबदार आहेत, असा आरोप परिसरातील महिलांनी केला. प्रमिला यांच्या शेजारणीने सांगितले, शनिवारी पाणी न आल्याने त्या प्रथमच खदाणीवर गेल्या. सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत पाणी येते, तेदेखील कमी दाबाने. त्यामुळे खूप हाल होतात. या परिसरात राहणाऱ्या कविता जाधव म्हणाल्या, गेल्या महिनाभरात शुक्रवार, शनिवार आणि रविवार सलग तीन दिवस पाणी येत नाही. त्यामुळे हाल होतात. यापूर्वी आम्ही दुुसऱ्या चाळीत राहत होतो. ती जागा आम्ही विकली. दुसरीकडे भाड्याने राहण्यासाठी गेलो. जागा बदलली पण पाण्याचा प्रश्न सुटला नाही. माय-लेकांचा जीव गेल्याची घटना ऐकून आमच्यावरही अशीच वेळ येते का, अशी भीती आम्हाला सतावू लागली आहे. ज्येष्ठ महिला मनकर नायंगले यांनी सांगितले, दोन वर्षांपूर्वी आम्ही या परिसरात साडेचार लाख रुपये मोजून घर घेतले. घर विकताना चाळमालकाने आम्हाला पाणी चांगल्या प्रकारे येते असे भासविले. घर घेतल्यानंतर काही महिन्यांत पाण्याचा त्रास समोर आला. पुन्हा दोन हजार रुपये खर्च करून दुसऱ्या वाहिनीवरून नळजोडणी घेतली. तरीदेखील पुरेसे पाणी येत नाही. ज्या खदाणीत मायलेकांचा मृत्यू झाला. त्या खदाणीच्या बाहेरच भोपर, देसलेपाडा ग्रामपंचायतीने बोर्ड लावला आहे... पाणी खोल असल्याने कपडे धुणे व पोहण्यास सक्त मनाई असल्याचा उल्लेख त्यावर आहे. भोपर, देसलेपाडा आता महापालिका हद्दीत आहे. पालिकेतर्फे तेथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. खदाणीतील पाणी कपडे धुण्यासाठी वापरले जाते. तसेच जवळच्या वीटभट्टीवर विटा तयार करण्यासाठीही त्याचा वापर होतो. ज्येष्ठ नागरिक महादेव देसले यांनी सांगितले. अनेक जण या खदाणीत बुडाले आहेत. त्याचा नेमका आकडा त्यांना सांगता आला नाही. काही वर्षांपूवी खदाणीभोवती तारेचे कुंपण घातले होते. ते पुढे काही लोकांनी काढून फेकून दिले.