शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे आंदोलन , १४ एप्रिल रोजी होणार समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:40 IST

ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात डिसेंबरमध्ये नागपूरहून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची राज्यस्तरीय जागृती रॅली बुधवारी कल्याणमधून मार्गस्थ झाली.

कल्याण : ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात डिसेंबरमध्ये नागपूरहून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची राज्यस्तरीय जागृती रॅली बुधवारी कल्याणमधून मार्गस्थ झाली. या वेळी ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात १४ एप्रिलपर्यंत योग्य तो तोडगा न निघाल्यास शेतकºयांप्रमाणे ओबीसीही आंदोलन छेडतील, असा इशारा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी या वेळी दिला.१९ डिसेंबरला या जागृती अभियान रॅलीला प्रारंभ झाला आहे. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तिचा समारोप होणार आहे.कल्याणमार्गे बुधवारी ही रॅली पुढे मार्गस्थ झाली. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, राजेश शिंदे, राजेंद्र नांदोस्कर, प्रसन्न अचलकर, एकनाथ म्हात्रे, निरंजन भोसले व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीचे नेतृत्व ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळबुधे करत आहेत.मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारावे. ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहीर करून त्यांना केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून निधीची वेगळी तरतूद करावी. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी रुपये भांडवल द्यावे. उद्योग-व्यवसायासाठी १० लाखांपर्यंत कर्जमर्यादा वाढवावी. क्रिमिलेअरची अट रद्द करावी. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची तातडीने आणि ठोस अंमलबजावणी करा. मंडल कमिशनची १०० टक्के अंमलबजावणी करा. शेतकºयांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करा. त्याचबरोबर शेतकºयांच्या तरुण मुलांना उद्योगासाठी विनाव्याज कर्ज द्या. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण आहे, पण विधानसभा व लोकसभेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. तीन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्री-शिप ताबडतोब अदा करावी. स्पर्धा परीक्षेत महिलांना क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करावी तसेच देशात १६०० ओबीसी विद्यार्थी आयएएस झाले आहेत, परंतु नॉन-क्रिमिलेअरच्या अटीमुळे या प्रक्रियेतून त्यांना बाद ठरवले गेले. त्यांना पुन्हा संधी द्यावी, अशा प्रमुख मागण्या ओबीसी सेलच्या असल्याकडे बाळबुधे यांनी या वेळी लक्ष वेधले.>उल्हासनगरकडे रॅली मार्गस्थबुधवारी सकाळी ११ च्या सुमारास शीळफाटामार्गे कल्याण ग्रामीण भागात निघालेली ही अभियान रॅली पुढे मानपाडा, गोळवली, कल्याण पूर्वेकडील सूचकनाका, चक्कीनाका, तिसगाव चौक, काटेमानिवली, विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक, वालधुनी उड्डाणपूलमार्गे कल्याण पश्चिमेकडील सुभाष चौक, पौर्णिमा चौक, बिर्ला महाविद्यालय, खडकपाडा चौक, आधारवाडी चौक, लालचौकी, पारनाका, टिळक चौक, महापालिका मुख्यालय, शिवाजी चौक, बाजारपेठमार्गे नेहरू चौक यानंतर महात्मा फुले चौकमार्गे उल्हासनगरकडे या रॅलीचे प्रस्थान झाले.