शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणी नाचले तरच नाट्यसंमेलन यशस्वी होईल - अशोक समेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 05:53 IST

राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे नाट्यसंमेलनाच्या अनिश्चिततेबाबत नाट्य परिषदेच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे वक्तव्य ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ आणि ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ‘लोकमत’कडे केले.

प्रज्ञा म्हात्रे ठाणे : राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे नाट्यसंमेलनाच्या अनिश्चिततेबाबत नाट्य परिषदेच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे वक्तव्य ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ आणि ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ‘लोकमत’कडे केले. नाट्यसंमेलनाच्या रंगमंचावर राजकारणी नाचले तरच तुमचे संमेलन यशस्वी होणार आहे का, असा सवाल करतानाच सरकारी मदतीखेरीज नाट्य परिषदेला संमेलन करता येत नसेल, तर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे, अशी मागणी समेळ यांनी केली.महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याने नाट्यसंमेलन पुढे का ढकलायचे, असा सवाल समेळ यांनी केला तर उद्या पाच वर्षे कोणतेही सरकार आले नाही आणि अशीच अस्थिर परिस्थिती राहिली, राष्ट्रपती राजवट सुरू राहिली तर पाच वर्षे कोणतेही संमेलन घेणार नाहीत का? असा सवाल बागवे यांनी केला.ठाण्यात गुरुवारी गंधार गौरव सोहळा पार पडला. त्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी हा निषेधाचा सूर व्यक्त केला. समेळ म्हणाले की, नाट्य परिषदेने नाट्यसंमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे, असे अलीकडेच जाहीर केले. अस्थिर राजकारणामुळे नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याचे कारण काय? नाट्यसंमेलन मराठी प्रेक्षकांसाठी आहे. तेथे राजकारण कशाला यायला हवे. नाट्यसंमेलनासाठी मराठी नाट्यरसिकांकडे देणगी मागितल्यास कोट्यवधी रुपये जमा होतील. नाट्यसंमेलनाकरिता सरकारकडून पैसे मागण्याची गरज नाही. सरकारच्या पैशांखेरीज नाट्यसंमेलन करून दाखवावे. ती ताकद नसेल तर राजीनामा द्यावा आणि गप्प बसावे. राजकारण्यांनी पैसा दिला किंवा ते स्टेजवर येऊन नाचले तरच तुमचे नाट्यसंमेलन होणार आहे का? नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याच्या भूमिकेचा मी निषेध करतो, असे समेळ म्हणाले. आजही मराठी रसिकांना आवाहन करा, ते त्यांच्या खिशातून लाखो रुपये काढून देतील आणि तुमचे नाट्यसंमेलन करतील, असेही ते म्हणाले.बागवे म्हणाले की, आमच्या सूत्रांकडून कळले आहे की, नाट्यसंमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. साहित्यसंमेलन आता जानेवारीमध्ये आहे ते पण पुढे ढकलणार का? एवढे मोठे महानाट्य महाराष्ट्राच्या रंगभूमीवर चालले असल्यामुळे नाट्यसंमेलन पुढे ढकलले आहे का? सरकार देत असलेल्या देणगीमूल्यावर सर्व संमेलने होत असतात. मग आपण सगळे कलाकार, लेखक इतके लाचार झालो आहोत, की राजकीय अस्थिरतेमुळे आपली संमेलने, आपले सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलावे? आता या सगळ्या कलाकारांनीच या राजकारण्यांना कुठेतरी ढकलावे. सामान्य रसिकांना संमेलने व्हावी आणि त्यांच्या प्रगल्भतेत वाढ व्हावी, असे वाटत असते. नाट्यसंमेलन नावाची एवढी मोठी गोष्ट राजकीय अस्थिरतेमुळे पुढे ढकलत असतील, तर आम्ही आमची नाराजी प्रकट करणार.संमेलन म्हणजे सर्वजण एकत्र येणे. राजकीय लोक एकत्र येत नाहीत. पण कलाकार एकत्र येतात. नाट्यसंमेलन रसिकांच्या देणगीतून होऊ शकते. एका सभागृहात साधेपणाने संमेलन घेता येईल. कोणत्याही कलाकाराला मानधन द्यायचे नाही. जेवणाचे डबे आणायचे असतील, त्याला आमची हरकत नाही. अशी साधेपणाने संमेलने होऊ शकतात, हे लोकांना दाखवून देण्याची गरज आहे, असे बागवे म्हणाले.संमेलनाच्या मंचावर राजकीय नेते कशाला पाहिजेत. कुठल्याही संमेलनाच्या व्यासपीठावर स्वागताध्यक्ष राजकीय नेता हवा असतो, कारण तो पैसे देतो, त्याचा कलेशी काही संबंध नसतो. त्याचा ‘न कलेशी’ संबंध असतो. त्यामुळे नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सांगावे वाटते की, आपण आपली कला राजकारण्यांवर सोपवू नये. या राजकारण्यांना आपण सांगितले पाहिजे, कलेतून कसे एकत्र यावे. संमेलन कसे करावे आणि रसिकांना आनंद कसा द्यावा. नाट्यसंमेलन पुढे ढकलले याचा आंतरिक निषेध करतोय, असेही बागवे म्हणाले.>'महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्वस्थ करणारी'सध्याची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती एक कलाकार म्हणून अस्वस्थ करणारी आहे. जनतेने तुम्हाला कौल दिला होता. कुणी राज्य करावे व कुणी विरोधात बसावे, हे स्पष्ट निर्देशित केले होते. आपणाला जनतेसाठी काम करायचे की वैयक्तिक हिताकरिता काम करायचे, याचा विचार राजकारण्यांनी करावा. मात्र सारेच पक्ष आपले घोडे दामटण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे मला मान्य नाही. आजची राजकीय परिस्थिती चिंताजनक आहे. -अशोक समेळ