शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

ठाणे परिवहन सेवेच्या थांब्यावरील प्रवासी उचलल्यास खाजगी बसेसच्या विरोधात होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:37 IST

वारंवार पत्रव्यवहार करुन खाजगी बसेसच्या विरोधात पुरावे सादर करुन देखील आरटीओकडून या बसेसवर कारवाईच होत नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत प्रशासनाचे निदर्शनास आणली आहे.

ठळक मुद्देबसथांब्यावरील प्रवासी उचलल्यास होणार कारवाईशहरात २३० खाजगी बसेस

ठाणे - तीन महिन्यांपूर्वी शहरात विविध ठिकाणी अवैधरित्या धावणाºया खाजगी बसेसचे छायाचित्र सहपोलीस आयुक्त तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीमध्ये सादर करण्यात आल्यानंतरही या बसेसवर कारवाईच झाली नसल्याची खंत परिवहन प्रशासनाने व्यक्त केली आहे. मात्र तरीही अद्याप खाजगी बसेसची वाहतूक सुरूच असल्याने अखेर यापुढे अशा खाजगी बसेसवर गुन्हा दाखल केल्यानंतर संबधींत पोलीस स्टेशन आरटीओकडे ताशा प्रकारचा अहवाल देतील अशी माहिती परिवहन व्यवस्थापन संदीप माळवी यांनी दिली आहे .           शुक्र वारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीमध्ये खाजगी बस वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला. परिवहन सदस्य सचिन शिंदे यांनी बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. परिवहनच्या गेल्या पाच ते सहा बैठकीमध्ये खाजगी बस वाहतुकीवर चर्चा करण्यात आली आहे. विशेष शिंदे यांनी शहरात सध्या किती खाजगी बसेस धावतात याची आकडेवारी देखील मागील परिवहनच्या बैठकीमध्ये सादर केली होती. मात्र अद्याप परिवहन प्रशासनाच्या वतीने कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नसून या खाजगी बसेस शहरात सुरूच असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. या खाजगी बसेस केवळ परिवहनचे प्रवासीच उचलत नसून परिवहनच्या बस थांब्याचा देखील वापर करत असल्याचे त्यांनी बैठकीमध्ये सांगितले. जवळपास २३० खाजगी बसेसची शहरात वाहतूक सुरु असून कोणत्याही प्रकारची कारवाई कोणत्याच यंत्रणेकडून होत नसल्याबाबद्दल परिवहन सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.प्रशासनाच्या वतीने उत्तर देताना परिवहन अधीक्षक धात्रक यांनी खाजगी बसेस संदर्भात खुलासा केला. खाजगी बसेसच्या संदर्भात वारंवार प्रादेशिक परिवहन विभागाला माहिती दिली जाते. विशेष म्हणजे तीन महिन्यापूर्वी खाजगी बसेस संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे आणि इतर महत्वाचे अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत शहरात कुठे कुठे खाजगी बसेसची वाहतूक सुरु आहे, कोणत्या रूटवर सुरु आहे याचे छायाचित्र देखील या बैठकीत सादर करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा लवकरच एक बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे धात्रक यांनी स्पष्ट केले.परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी खाजगी बसेसवर वारंवार कारवाई करत असल्याची माहिती दिली. मात्र तरीही बसेस बंद होत नसल्याचे निदर्शनास आले असल्याने आता परिवहनच्या बसथांब्यावरुन प्रवासी उचलण्याचा प्रयत्न झाल्यास, यापुढे अशा खाजगी बसेसवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. गुन्हे दाखल केल्यानंतर काही प्रमाणात अशा खाजगी बसेसवर वचक बसेल असा दावा परिवहन प्रशासनाने केला आहे. गुन्हे दाखल केल्यानंतर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्र ार जाणार असल्याने ठोस कारवाई होऊ शकेल अशी अशा परिवहन प्रशासनाला आहे. परिवहन सदस्यांनी देखील याबाबत संमती दर्शवली असून येत्या काही दिवसात अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रि या सुरु करणार असल्याचे माळवी यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त