शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बदली न केल्यास सुट्टीवर जाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:29 IST

ज्यांनी माझा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडर म्हणून वापर केला, ज्यांच्या नजरेत मी कालपर्यंत हीरो होतो, त्यांनीच मला आज झीरो केले आहे.

ठाणे : ज्यांनी माझा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडर म्हणून वापर केला, ज्यांच्या नजरेत मी कालपर्यंत हीरो होतो, त्यांनीच मला आज झीरो केले आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका करुन माझ्या बदनामीचे प्रयत्न केले जात असल्याचा टोला ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सत्ताधारी भाजपाचा उल्लेख न करता लगावला. भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी सातत्याने जयस्वाल यांना लक्ष्य केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाटणकर यांची टीका रोखली नसल्याने ते व्यथित झाल्याचे चित्र दिसले. एप्रिलपर्यंत बदली झाली नाही तर बदलीचे आदेश प्राप्त होईपर्यंत मी सुट्टीवर जाईन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.जयस्वाल म्हणाले की, मलाच आयुक्तपदी राहण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु शासन माझी बदली करीत नाही, त्यामुळे आता सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वास ठराव करावा आणि मला येथून परत पाठवावे. आईशप्पथ मी या ठरावाला कोणताही विरोध करणार नाही.ठाणे पालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयस्वाल यांच्या कामाची तारीफ केली होती व त्यांना आलेल्या धमक्यांचा मुद्दा प्रचारात मांडून शिवसेनेला लक्ष्य केले होते. साहजिकच जयस्वाल ब्रँडचा वापर भाजपाने केला होता. मात्र वर्षभरातच महापालिकेतील भाजपाचे गटनेते पाटणकर यांनी जयस्वाल यांच्यावर सातत्याने आरोप, टीका यांचा भडीमार सुरु केल्याने ते दु:खी झाले आहेत.मंगळवारी महासभा सुरु होताच, मुंब्रा स्टेडीयमच्या मुद्यावरुन राष्टÑवादी आणि भाजपामध्ये चांगलेच वातावरण तापले होते. तसेच याच महासभेत भाजपाचे गटनेते पाटणकर यांनी पोलिसांना बुलेट देण्याच्या प्रकरणावरुन सभा तहकुबी मांडली होती. त्यामुळे प्रशासनातील सर्वच अधिकारी चिंतेत होते. त्यातच मुंब्य्राच्या स्टेडीअमवर सुरु असलेल्या वादाच्या वेळेस भाजपाच्या नगरसेवकाने प्रशासनाने मोबाईलवर वाचलेल्या पत्रावर आक्षेप घेतल्याने आयुक्त संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या बदलीसाठी भावनिक आवाहन केले. स्थायी समिती नसल्याने ३५ (अ) नुसार प्रशासकीय वित्तीय मान्यतेचे विषय हे महासभेच्या पटलावर येत असतात. त्यामुळे महासभेत येणाºया विषयांची संख्या वाढली आहे. परंतु, काही मंडळी प्रशासनावर बोट ठेवत आहेत हे चुकीचे आहे. तीन वर्षे मी माझे घरदार विसरुन शहराचा विकास व्हावा यासाठी दिवस-रात्र प्रयत्न केले. परंतु आॅक्टोबर महिन्यात माझी ज्या पध्दतीने वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हापासूनच मी व्यथित होतो. माझी बदली व्हावी यासाठी मी प्रयत्न करीत होतो. परंतु माझी बदलीची विनंती मान्य झाली नसल्याचेही जयस्वाल यांनी कबुल केले. काही राजकीय घटकांनी माझ्या विरोधात वातावरण तयार करुन मला बदनाम करण्याचे कारस्थान रचले. काहींनी माझी बदली व्हावी यासाठी प्रयत्न केले. तीन वर्षात ज्या मंडळींनी माझा वापर ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडेर म्हणून केला, ज्यांनी मला हिरो ठरवले. त्याच लोकांनी माझ्यावर वैयक्तिक टीका करुन एका क्षणात झिरो ठरवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका त्यांनी भाजपाचा उल्लेख न करता केली. मला हुकमशहा, औरंगजेब अशा उपाधी देऊन माझ्यावर टीका झाली. मी संवेदनशील असल्याने मला याचे दु:ख होते. माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचे मला जास्त दु:ख होत असल्याचे त्यांनी सांगितले. भांडणे कोणाची होत नाही, असा सवाल जयस्वाल यांनी केला.हीरोचा झिरो करण्याचा प्रयत्नब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडर म्हणून ज्यांनी माझा वापर केला, हीरो ठरवले. त्यांनीच हुकमशहा, औरंगजेब अशी उपाधी देत, वैयक्तिक टीका करुन एका क्षणात झिरो ठरवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका त्यांनी भाजपाचा उल्लेख न करता केली. सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वास ठराव करावा आणि मला येथून परत पाठवावे, असे तेम्हणाले.कुणी माझ्यावर कितीही टीका केली तरी जनतेच्या मनात माझे रिपोर्ट कार्ड तयार आहे. त्यामुळे मला टीकेची मुळीच चिंता वाटत नाही. परंतु आता मलाच या शहराच्या आयुक्तपदी राहायचे नाही. त्यासाठी आजपासूनच मी सुट्टीवर जाणार होतो. परंतु रात्री मला एकाने आश्वासन दिल्याने मी सुट्टी रद्द केली आहे. माझ्यावर अविश्वासाचा ठराव जे मांडतील त्यांचे मी मनापासून आभार मानेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मी बदलीची वाट पाहीन. एप्रिलपर्यंत जर माझी बदली झाली नाही, तर मात्र जोपर्यंत माझ्या बदलीची आॅर्डर येत नाही, तोपर्यंत मी सुट्टीवर जाईन, असा इशाराही त्यांनी सभागृहातील आपल्या भाषणादरम्यान दिला.माझेही सभागृहातील सदस्यांबरोबर कित्येक वेळेला भांडण झाले. परंतु त्याचा राग मनात ठेवत मी कधीही ते वैयक्तिक पातळीवर नेले नाही किंवा त्यावरून कुणावर वैयक्तिक टीका केली नाही. मात्र माझ्यावर वैयक्तिक आरोप करत माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला, असे जयस्वाल म्हणाले.