शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोषी आढळल्यास नगरसेवकांवर कारवाई, आयुक्तांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 03:56 IST

मीरा- भार्इंदर महापालिकेत निवडून आलेल्या पाच नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या तक्रारींवर सोमवारी आयुक्तांनी सुनावणी घेतली. या वेळी दोन नगरसेवक अनुपस्थित होते.

मीरा रोड - मीरा- भार्इंदर महापालिकेत निवडून आलेल्या पाच नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या तक्रारींवर सोमवारी आयुक्तांनी सुनावणी घेतली. या वेळी दोन नगरसेवक अनुपस्थित होते. तर अन्य दोन नगरसेवकांचीही सुुनावणी होणार आहे. ज्या नगरसेवकां विरोधात तक्रारी आहेत त्यांची बाजू ऐकली जाईल. त्या नंतर योग्य तो निर्णय घेऊ. कुणालाही पाठिशी घालणे वा झुकते माप देण्यात येणार नाही. दोषी नगरसेवकांवर कारवाई करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. सचिव वासुदेव शिरवळकर उपस्थित होते.काँग्रेस समर्थक नगरसेवक राजीव मेहरा यांनी उमेदवारी अर्जात त्यांच्यावर दाखल गुन्हा लपवला प्रकरणी पराभूत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार साबीर शेख व भाजपा उमेदवार साजी आयपी यांनी तक्रारी केल्या आहेत. शेख यांच्या तक्रारीवर सुनावणी असताना मेहरा यांनी आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे सुनावणी पुढे होणार आहे.काँग्रेसचे नरेश पाटील यांनी उमेदवारी अर्जात आपली जन्मतारीख चुकीची व शिक्षण सातवी असताना नववीपर्यंत झाल्याची चुकीची माहिती दिल्याची तक्रार भाजपाचे डॉ. सुरेश येवले यांनी केली होती. त्यावर सुनावणीच्यावेळी पाटील यांनी आपली जन्मतारीख फक्त पॅनकार्डवर वेगळी असून बाकी सर्व दाखले कागदांवर अर्जात नमूद तारीखच आहे असे म्हटले. शिवाय अर्ज भरताना चुकून झाले असून सातवीचा शाळा सोडल्याचा दाखला अर्जासोबत जोडल्याचे सांगितले.भाजपाच्या भार्इंदर पूर्व भागातील नगरसेविका मेघना रावल यांचे पती दीपक यांनी साईबाबानगर येथे एका हॉटेल इमारतीत बेकायदा बांधकाम केले म्हणून मेघना यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी इरबा कोनापुरे यांनी केली आहे. मूळात पालिकेने दिलेली इमारत बांधकाम परवानगीही चुकीची असल्याचे इरबा यांनी म्हटले होते. सुनावणीच्यावेळी मात्र मेघना या गैरहजर राहिल्या. आपण बाहेरगावी जात असल्याचे पत्र शनिवारी त्यांनी सचिवांना दिले होते. इरबा यांनी हा वेळकाढूपणा असून यापुढे मेघना यांना वेळ देऊ नये अशी मागणी केली.कनकिया भागात बेकायदा बांधकाम करून कार्यालय, वाचनालय आदी चालवल्याने भाजपा नगरसेविका नीला सोन्स व नगरसेवक विजय राय यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची तक्रार ब्रिजेश शर्मा व रोलन मिरांडा यांनी केली होती. सुनावणीच्यावेळी या दोन्ही नगरसेवकांनी बांधकाम आपण नगरसेवक होण्यापूर्वी पासूनच पक्ष कार्यालय होते व ते कुणी बांधले याची माहिती नाही असा दावा केला. त्यावर मिरांडा यांनी जमीन आपल्या आजीची असून ती बळकावून बेकायदा बांधकाम केल्याचे म्हटले.परशुराम म्हात्रे, अनिता पाटील यांच्यावर गुन्हेपेणकरपाडा येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करुन बेकायदा बांधकाम प्रकरणी भाजपाचे नगरसेवक परशुराम म्हात्रे व शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला.बांधकाम प्रकरणी सुनावणी आधीही झाली असा दावा तक्रारदार भरत मोकल यांचा आहे. तर दोन नगरसेवकांची सुनावणी लवकरच घेतली जाणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. याकडे आता लक्ष लागले आहे.पालिकेने रावल यांचे बांधकाम बेकायदा असल्याचे स्पष्ट केल्याने आयुक्तांकडून लावकरच निर्णय होईल अशी आशा आहे. पण रावल या हजर न राहता वेळकाढूपणा करत आहेत. पालिकेने दबावाला बळी न पडता ठोस कार्यवाही करावी.- इरबा कोनापुरे, तक्रारदार 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरnewsबातम्या