शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाचे काम न झाल्यास अवमान याचिका दाखल करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:58 IST

सुरळके यांचा इशारा । ४२ गावांना होणार फायदा

शहापूर : केंद्र व राज्य सरकारने डिसेंबरअखेर वासिंद येथील ४२ गावांना जोडणारा उड्डाणपूल बांधणार, असे प्रतिज्ञापत्र दिलेले असतानाही सरकारच्या उदासीनतेमुळे पुलाचे काम पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण, पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. यासंदर्भात याचिकाकर्ते संजय सुरळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालानुसार मार्चअखेरपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या ४० वर्षांपासून वासिंद व परिसरातील ४२ गावांतील हजारो ग्रामस्थांचा वासिंद रेल्वे उड्डाणपूल व पावसाळ्यात जाचक ठरणाऱ्या भुयारी मार्गाबाबत उच्च न्यायालयाने नुकताच अंतिम निकाल जाहीर केला होता. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदरजोग व न्यायमूर्ती नितीन जामदार यांनी निकालपत्रामध्ये याचिकाकर्ते सुरळके यांनी या नागरी समस्यांच्या बाबतीत गंभीरपणे मांडलेल्या वासिंद रेल्वे बोगदा व बंद रेल्वे गेटचे विश्लेषण केले. तसेच न्यायमूर्ती अभय ओक यांच्या समितीने भेट देऊन पाहणी अहवाल सादर केला होता.सरकारी दिरंगाईबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. सलग दोन वर्षे उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर केली जात होती. केंद्र व राज्य सरकारने डिसेंबरअखेर पूल बांधण्याचे शपथपत्र दिले होते. या चालू आर्थिक वर्षाअखेर उड्डाणपुलाचे बांधकाम शक्य तितक्या लवकर पूर्ण झाले पाहिजे, असे आदेश दिले आहेत. मात्र, पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सुरळके हे स्वत: या दिरंगाईच्या निषेधार्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. उड्डाणपूल झाल्यास ४२ गावांतील ग्रामस्थांची दैना थांबणार आहे. 

टॅग्स :thaneठाणे