शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धरण मिळाल्यास पाणीकपात संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:33 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता महापालिकेस काळू धरण हवे आहे.

मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता महापालिकेस काळू धरण हवे आहे. महापालिकेने या धरणावर दावा सांगितला आहे. पुढील ३० वर्षाचे पाण्याचे नियोजन करुन नागरिकांची तहान भागविण्यासाठी काळू धरण उभारण्याचा प्रस्ताव महापालिका राज्य सरकारला सादर करणार आहे.महापालिकेच्या कालच्या महासभेत मुरबाड तालुक्यातील पाडाळे येथील धरण बांधण्याचा अशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा ठराव राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. पाडाळे धरण हे आकाराने छोटे असून त्यातून केवळ २० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होऊ शकतो. इतक्या कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार असेल तर शहरासाठी पुढील ३० वर्षाकरीता पाण्याचे नियोजन खरोखरच होईल का, असा सवाल उपस्थित होतो आहे. पाडाळे धरण उल्हासनगर, भिवंडी महापालिका व अंबरनाथ पालिकेस हवे आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांनीही तसा मानस व्यक्त केला आहे.या विषयी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे विचारणा केली असता पाडाळे ऐवजी महापालिकेस काळू धरण घेण्याचा ठराव करण्यात येणार आहे. काळू धरणातून महापालिकेस एक हजार दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होऊ शकतो. काळू धरणावर महापालिका दावा सांगणार आहे. महापालिकेच्या विकासाकडे राज्यातील शिवसेना व भाजपा युतीचे चांगले लक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काळू धरण महापालिकेस देण्याचा विचार होऊ शकतो. मात्र या मागणीला अन्य महापालिकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.यापूर्वी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कर्जत येथील कोंढाणे धरण केडीएमसीकडे घेण्याची मागणी केली होती. मात्र त्याबाबतचा ठराव महापालिकेने केलेला नाही. कोंढाणे धरणाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरु आहे. कोंढाणे धरण महापालिकेने आपल्याकडे घेण्याचा ठराव केला असता तर महापालिका क्षेत्राला सहा हजार दशलक्ष लीटर पाणी मिळाले असते. प्रत्यक्षात महापालिकेला काळू धरण हवे आहे.महापालिका उल्हास नदी पात्रातून दररोज ३१० दशलक्ष लीटर पाणी उचलते. या पाण्यावर बारावे, मोहिली, टिटवाळा आणि नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन हे पाणी शहरी भागाला वितरीत केले जाते. २७ गावांसाठी आजही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो. आत्ता महापालिका क्षेत्रात पुरेसा पाणीपुरवठा होत असला तरी २७ गावांचे पाण्याविषयीचे परालंबित्व नष्ट करण्यासाठी महापालिकेने धरण घेतल्यास २७ गावांसह शहरातील पाणी समस्या संपुष्टात येऊ शकते. उल्हास नदी पात्रातून केवळ केडीएमसीच पाणी उचलत नाही तर स्टेम पाणीपुरवठा, औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी उचलते. कल्याण डोंबिवलीला ३१० दशलक्ष लीटर हा मंजूर पाणीपुरवठा आहे. अन्य पाणी ग्राहकही पाणी उचलतात. त्यामुळे दरवर्षी पाणी नियोजनासाठी प्रथम सात नंतर १४ टक्के पाणीकपात लागू केली जाते. काळू धरण महापालिकेचे झाल्यास या पाणी कपातीतून महापालिकेची मुक्तता होऊ शकते. महापालिकेस २७ गावांच्या हद्दवाढीचे अनुदान दिले जात नाही. एलबीटीपोटीचे अनुदान रखडले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती ठीक नाही. अशा परिस्थितीत धरणासाठी किती पैसा लागतो व ते उभे करण्याची कुवत महापालिकेकडे आहे का ? त्याचा खर्च व किंमत सरकार भरणार आहे का, हे प्रश्न आहेत.