शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कुल्हड सात रुपये तर चहा विकावा लागताे पाच रुपयात, समीकरण जुळवायचे कसे? कॅण्टीनचालकांपुढे पेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 23:35 IST

Tea News : रेल्वे मंत्रालय, दिल्ली बोर्डच्या सूचनेनुसार रेल्वे स्थानकांतील कॅण्टीनमध्ये चहासाठी कुल्हडचा वापर तातडीने सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.

- अनिकेत घमंडीडाेंबिवली - रेल्वे मंत्रालय, दिल्ली बोर्डच्या सूचनेनुसार रेल्वे स्थानकांतील कॅण्टीनमध्ये चहासाठी कुल्हडचा वापर तातडीने सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. मात्र, मुंबई विभागात कुल्हड प्रति नग सात रुपयांना मिळत आहे. तर, कॅण्टीनमध्ये प्रति कप चहा पाच रुपयांना विकला जातो. त्यामुळे ते समीकरण कसे जुळवायचे? असा पेच कॅण्टीनचालकांपुढे आहे.मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, दादर, एलटीटी, कुर्ला, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, कसारा, इगतपुरी या स्थानकांमध्ये कुल्हडमधून चहा मिळत असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या कोविडमुळे सर्वच कॅण्टीनमध्ये चहा मिळतोय असेही नाही, तसेच जेथे मिळतोय तेथे ग्राहकांना मागणीनुसार कुल्हड मिळताे.  ठाणे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल थांबतात त्या फलाटावर  कोरोनापूर्वी दिवसाला सुमारे ३०० कप चहाची विक्री होत होती. आता  दिवसाला केवळ ३० ते ४० कपच चहा विक्री होत आहे अशी माहिती देण्यात आली. त्यातही काही प्रवासी कुल्हड मागत नाहीत, असे काही व्यावसायिकांनी  सांगितले. 

जिल्ह्यात कोठून येते कुल्हड ?ठाण्यात जांभळीनाका, वाशीहून कुल्हड मागविण्यात येत आहेत. प्रतिनग सात रुपयांना ते पडते. किमान १०० नग खरेदी करावे लागतात. त्यातही ते तुटले तर कॅण्टीनचालकांच्या अंगावर पडते. आधीच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यात कुल्हडमुळे होणारा कचरा जास्त व वजनदार होणार असल्याने त्याची विल्हेवाट कशी लावायची? हाही प्रश्नच आहे. 

चहाचा दर वाढवा! रेल्वे प्रशासनाचा चहासाठी कुल्हडचा प्रयोग पर्यावरणीय दृष्टीने चांगला आहे, पण मुंबई परिसरात ते सहज उपलब्ध हाेत नाहीत. चहाची किंमत वाढवून दिल्यास व्यवसाय करणे सोपे जाईल.     - विजय सिंघल, कॅण्टीन मॅनेजर 

कागदी कप याेग्य पर्याय कुल्हड महाग पडतो. आतापर्यंत प्रत्येक वेळेला १०० नग खरेदी केले आहेत. कुल्हडची किंमत व चहाविक्रीचा दर, हे समीकरण जुळविताना नाकीनऊ येत असून ‘कागदी कप’ हा चांगला पर्याय आहे.    - मनाेज अगरवाल, कॅण्टीन मॅनेजर 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे