शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त नोकरदार नाही तर स्वत:ला हुकमशहा समजतात, महापौरांनी डागली आयुक्तांवर तोफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:13 IST

ठाणे महापालिका आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे यापुढे माझा अपमान केला गेला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन असा इशारा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना दिला आहे.

ठळक मुद्देमहापौर आणि आयुक्तांमधील शितयुध्द आणखी पेटण्याची चिन्हेपुन्हा अपमान झाल्यास माझ्या अधिकाराचा वापर करेन

ठाणे - महापौरांनी रेंटलच्या घराच्या मुद्यावरुन आणि त्यानंतर महासभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आयुक्त आणि महापौरांमधील शीतयुध्द आता आणखीनच पेटण्याची चिन्हे आहेत. आयुक्त हे ठाणेकरांचे नोकरदार आहेत, परंतु ते हेच विसरले असून ते हुकमशाही पध्दतीनेच काम करीत असल्याचा आरोप महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी ठाणेकरांची माफी मागावी असे सुतोवाचही त्यांनी केले आहेत. तसेच यापुढे जर माझा अपमान झाला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन असा इशाराही त्यांनी दिला.               मंगळवारी महासभा सुरु झाल्यानंतर लक्षवेधी आणि प्रश्नउत्तरांच्याच तासामुळे लांबली. त्यामुळे ती सभा तहकुब करुन बुधवारी पुन्हा ही सभा लावण्यात आली होती. मात्र, दुपारी दीड वाजले तरी पालिका सचिवांव्यतिरीक्त एकही अधिकारी या सभेला उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे सभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे एकीकडे महासभा सुरु असतांनाच दुसरीकडे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अर्बन रिर्सच सेंटर येथे सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक लावली. मार्च अखेरच्या कामांमध्ये प्रशासकीय अधिकारी व्यस्त असून काही अधिकारी विधिमंडळ अधिवेशन आणि न्यायालयीन सुनावणीसाठी गेले आहेत अशी सबब प्रशासनातर्फे देण्यात आली. त्यामुळे सभेसाठी अधिकारी येणार नाही हे स्पष्ट झाले. त्यानंतर आता महासभा केव्हा लावायची हे मी ठरविणार असल्याचेही महापौरांनी प्रशासनाला सुनावले होते. आता या पुढे जाऊन महापौरांनी पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप लावले आहेत. पालिका आयुक्तांच्या हुकूमशाहीचा मात्र चांगलाच समाचार घेतला आहे. जे सरकारी नोकर आहेत ते स्वत:ला हुकूमशहा समजत आहेत, तुम्ही समोरा समोर चर्चा करायला घाबरता, दम असेल तर चर्चा करा असे थेट आव्हानच त्यांनी आयुक्तांना दिले आहे. नगरसेवक विरोधात बोलले तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात, महासभेला अनुपिस्थत राहून त्यांनी लोकशाहीचा अपमान केला आहे. महापौरांचे अधिकार अजून मी वापरलेले नाहीत मात्र वर्तणूक सुधारली नाही तर ते मी वापरू शकते, सभागृहात हक्कभंग ही येऊ शकतो, कसले ठाणे स्मार्ट करत आहात? स्वत:ला की शहराला? नागरिकांना उध्वस्त करून शहर स्मार्ट कसे होणार? असे विविध प्रश्न उपस्थित करत महापौरांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर तोफ डागली तर ज्या वेळी गावदेवीचे गाळे उद्धवस्त केले गेले तेव्हाच ठाणेकरांनी आंदोलन करायला हवे होते अशी भुमीका महापौर शिंदे यांनी यावेळी मांडली.निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही गप्प -दुर्देवाने आज नगरसेवक देखील खुलेपणाने प्रशासनाला विरोध करायला घाबरत आहेत. काही अडचणीमुळे कदाचित लोकप्रतिनिधी आयुक्तांसमोर बोलायला घाबरतात किंवा खोट्या केस दाखल करू नये म्हणूनही लोकप्रतिनिधी शांत बसतात. मात्र जनतेचे प्रश्न मी मांडू शकत नाही तर त्या खुर्चीत बसण्याचा अधिकार काय आहे मला ? त्यामुळे पक्षाच्या भूमिकेपेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे असून ते मांडतच राहणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त