शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...तर कसाऱ्याचे होईल माळीण, दरड कोसळल्याने घराचे झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:40 IST

कसारा गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून परिसरातील आनंदनगर, पंचशीलनगर, देऊळवाडी, निंगडवाडी, ठाकूरवाडी, कोळीपाडा, तानाजीनगर या ठिकाणी डोंगर पोखरून नव्याने घरे उभी राहिली आहेत.

कसारा : कसारा गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून परिसरातील आनंदनगर, पंचशीलनगर, देऊळवाडी, निंगडवाडी, ठाकूरवाडी, कोळीपाडा, तानाजीनगर या ठिकाणी डोंगर पोखरून नव्याने घरे उभी राहिली आहेत. डोंगर कमकुवत झाल्याने भविष्यात अतिवृष्टीमुळे कसाºयाचे माळीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहापूर तालुक्यातील मोखावणे-कसारा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या पंचशीलनगर येथील सुनील शिंदे यांच्या घरावर शुक्रवारी दरड कोसळल्याने संपूर्ण घराचे नुकसान झाले. घरातील सर्वजण वेळेत बाहेर पळाले म्हणून वाचले.सतत कोसळणाºया पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात व रेल्वे घाटात दरड कोसळल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी सकाळी पंचशीलनगर येथील शिंदे यांच्या घरावर दरड व मातीचा मलबा कोसळल्याने त्यांच्या घरातील सर्व वस्तू मातीखाली गाडल्या गेल्याने शिंदे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. घरातील गॅस, अन्नधान्य, शालेय साहित्य, लॅपटॉपसह महत्त्वाच्या वस्तूंची नासधूस झाली आहे. या घटनेची दखल घेत तहसीलदार रवींद्र बावीस्कर यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. हा अहवाल सरकारकडे पाठवला.तहसीलदार बावीस्कर यांनी वनजमिनीवर उभ्या राहिलेल्या धोकादायक घरांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती दिली. कसारा-मोखावणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत मार्केयांनी अतिक्र मण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, कसाºयाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी नियोजनाचा अभाव आहे. यामुळे प्रशासनाने नियोजन करावे अशी मागणी होत आहे.>कसारा परिसरातील काही ठिकाणी भूस्खलन होऊन डोंगर खचत थेट घरावर पडत आहेत. अजून मोठ्या प्रमाणावर डोंगर खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. महसूल विभागाकडून धोकादायक घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या असून वनविभागाशी पत्रव्यवहार केला आहे.- रवींद्र बावीस्कर, तहसीलदारघरावर जेव्हा दोन दगड पडले, तेव्हा माझ्या मुलाने मला सांगितले की, घरावर कोणीतरी दगड फेकतोय. तेव्हा पाऊस पडत होता. मी घरामागे बघितले, तर माती खाली येत होती. क्षणाचा विलंब न लावता मी घरातील सर्व मंडळींना घराबाहेर काढले व काही समजण्याअगोदर घरावर दरड कोसळली.- सुनील शिंदे, पीडित