शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांमधून मिळणारे वैचारिक साहित्य दीर्घकाळ टिकणारे असते – डॉ. नितीन करीर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: February 15, 2024 19:34 IST

'विचारमंथन' व्याख्यानमाला वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित 'वाचन आणि मी' या विषयावरील १३ वे पुष्प संपन्न झाले.

ठाणे : इंटरनेट हे जरी सर्वांसाठी खुले असले तरी त्याचा वापर हा क्षणिक असतो, मात्र वाचन हे क्षणिक नसते, पुस्तकांच्या माध्यमातून मिळणारे वैचारिक साहित्य हे दीर्घकाळ टिकणारे असते. सामाजिक जीवनात वावरत असताना पुस्तके आणि वाचन हे खूप महत्वाचे आहे. पुस्तकांमधून आपण केवळ शिकतो किंवा आपले मनोरंजन होतेच असे नाही तर आपला जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि तो महत्वाचा असल्याचे मत राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी व्यक्त केले. 

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'विचारमंथन' व्याख्यानमाला वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित 'वाचन आणि मी' या विषयावरील १३ वे पुष्प संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. करीर म्हणाले की, पुस्तकाचे वाचन सैरभैर असायला हवे, ते एकांगी असू शकत नाही. अवांतर वाचनाचे महत्व हे सर्वांनी जाणून घ्यायला हवे. कुठल्याही कलेचा आनंद मग संगीत असो की वाचन ते अवांतर असायला हवे. पुस्तकांचे वेगवेगळे जॉनर आहेत, यापैकी कुठलेतरी एक जॉनर आपल्याशी बोलत असते. कुठल्या प्रकारची पुस्तके आपल्याशी बोलतात आणि हा पुस्तकांचा प्रवासच इतका छान असतो आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो. पुस्तके सतत आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतात फक्त आपली ऐकण्याची तयारी असली पाहिजे. वाचन आणि मी यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर म्हणाले की, माझे वाचन हे एका दिशेने कधीच नव्हते.. जशी दिशा मिळेल तसं वाचत आलो असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. शैलजा राजे, कुसुम अभ्यंकर, ज्योत्सना देवधर या लेखिकांची पुस्तके वाचण्यास सुरूवात केली. त्यानंतर सांगलीला महाविद्यालयात आल्यानंतर जी.ए ची पुस्तके वाचली. प्रत्येक टप्प्यावर जेव्हा मी जात होतो तेव्हा वाचनांचा परिणाम थेट जाणवत होता. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना मुक्तपणे पुस्तके हाताळण्यास संधी मिळावी यासाठी महापालिकेच्या शाळेत सुरू केलेला 'वाचन कोपरा' हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. शाळेच्या मुलांसाठी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल राज्याचे मुख्य सचिव डॉ. करीर व ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांचे कौतुक केले. आयुक्त बांगर यांनी मान्यवरांचे ग्रंथबुके व चित्रप्रतिमा देवून त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :thaneठाणे