शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

प्रत्येक गुन्ह्यात आरोपींची ओळख परेड आवश्यक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 05:14 IST

चोरी, दरोड्यासारखे गुन्हे करताना आरोपी स्वत:ची ओळख लपवितात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आरोपींची ओळख परेड अत्यावश्यक आहे का, असा सवाल करत, ठाणे न्यायालयाने तीन सोनसाखळी चोरांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

राजू ओढे ठाणे : चोरी, दरोड्यासारखे गुन्हे करताना आरोपी स्वत:ची ओळख लपवितात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आरोपींची ओळख परेड अत्यावश्यक आहे का, असा सवाल करत, ठाणे न्यायालयाने तीन सोनसाखळी चोरांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.चोरी किंवा दरोड्याच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी आपण पकडले जाऊ नये, यासाठी ओळख लपवत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे अनोळखी आरोपींविरुद्ध दाखल केले जातात. या गुन्ह्यांमधील खरे आरोपी शोधणे हे पोलिसांसाठी कौशल्याचे काम असते. अशा प्रकरणांची उकल करण्यात तपास अधिकारी क्वचित यशस्वी होतात, असे निरीक्षण ठाणे न्यायालयाने नोंदविले. राबोडी पोलीस ठाण्यातील एका सोनसाखळीच्या खटल्यामध्ये फिर्यादी महिलेने आरोपींना ओळखले नाही. बचाव पक्षाने हा मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित करून आरोपींना संशयाचा फायदा देण्याची विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्वाळ्याचा दाखला देत, न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही.भारतीय पुरावे कायद्याचे कलम ११४ अन्वये एखाद्या प्रकरणामध्ये न्यायसंगत तर्क लावण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत. एखाद्या व्यक्तीकडे दोन-तीन दागिने सापडल्यास ते त्याचे अथवा त्याच्या पत्नीचे आहेत, असे समजण्यास हरकत नाही. मात्र, आरोपींकडे मोठ्या प्रमाणात दागिने सापडले असून, त्याबाबत आरोपी स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत केवळ ओळख परेड होऊ शकली नाही, म्हणून आरोपींना संशयाचा फायदा देता येणार नाही, असे न्यायालयाने निकालामध्ये स्पष्टकेले आहे.>तपासातील त्रुटींचा आरोपींना फायदा नाहीसोनसाखळी चोरीतील तिन्ही आरोपी कल्याणजवळच्या आंबिवली येथील आहेत. पोलिसांनी आरोपींचा जबाब दुपारी ११.४५ वाजता नोंदविला. त्याच दिवशी दुपारी १२ ते ५ वाजताच्या दरम्यान तिन्ही आरोपींच्या आंबिवली येथील घरांमधून चोरीचे दागिने हस्तगत केल्याचे पोलिसांच्या दस्तावेजातून दिसते. अवघ्या १५ मिनिटांत पोलीस ठाण्याहून आंबिवली येथे कसे पोहोचले, असा युक्तिवाद करून, बचाव पक्षाने वेळोवेळी या मुद्द्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. या मुद्द्यावर तपास अधिकाºयाची चूक स्पष्टपणे दिसते. मात्र, सरकार पक्षाने आरोपींचा गुन्हा ठोस पद्धतीने सिद्ध केल्याचे स्पष्ट करून, तपासातील अशा त्रुटींचा फायदा नेहमीच आरोपींना देता येणार नाही, असे स्पष्ट निरीक्षणही न्यायालयाने या वेळी नोंदविले.>सोनसाखळी चोरांना सश्रम कारावासमहिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र खेचून नेणाºया कल्याणच्या तीन चोरांना ठाणे न्यायालयाने २३ फेब्रुवारीला२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मो. अफसर सय्यद (३३), अजिज हाफीज सय्यद (३३) आणि मुख्तार शेरू हुसेन उर्फ इराणी (२५) ही या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. तिघेही कल्याणमधील आंबिवली येथील रहिवासी आहेत.११ सप्टेंबर २०१४ला प्रज्ञा राजपूत नावाची महिला मैत्रीण कामिनी खैरनारसोबत पायी जात असताना, मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. प्रज्ञा राजपूत यांनी मंगळसूत्र पूर्ण ताकदीनिशी पकडून ठेवले. त्यामुळे मंगळसूत्र तुटून अर्धे आरोपींच्या आणि अर्धे प्रज्ञा यांच्या हातात राहिले. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांनी या प्रकरणाचा तपास केला. दरम्यान, गुन्हे अन्वेषण शाखेला कार्यरत असताना, तपास अधिकारी भुजबळ यांनी ३१ जानेवारी २०१६ला तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून सोन्याचे ३२ दागिने पोलिसांनी हस्तगत केले. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने तिन्ही आरोपींना २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी जवळपास दीड वर्षापासून तुरुंगात होते. तो कालावधी शिक्षेतून वगळण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले.

टॅग्स :thaneठाणे