शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

पांढरा हत्ती म्हणून कोंडदेव क्रीडागृहाची ओळख पुसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 03:46 IST

मागील कित्येक वर्षे असलेली दादोजी कोंडदेव क्रीडागृहाची पांढरा हत्ती अशी ओळख आता पुसली गेली असून या स्टेडिअमला आता सुगीचे दिवस येणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

ठाणे  - मागील कित्येक वर्षे असलेली दादोजी कोंडदेव क्रीडागृहाची पांढरा हत्ती अशी ओळख आता पुसली गेली असून या स्टेडिअमला आता सुगीचे दिवस येणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. मराठी कलाकारांचे सेलिब्रेटी लीग संपत नाही, तोच सोमवारपासून या स्टेडिअममध्ये आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. यानंतर बंगळुरू, चेन्नई आणि आयपीएलचालकांनी जाहिरातीसाठीसुद्धा या क्रीडागृहाची मागणी केली आहे. शिवाय, पुढील वर्षी याच स्टेडिअमवर रणजी सामन्यांच्या आयोजनासाठी पालिकेने पावले उचलली असल्याने येत्या काळात आंतरराष्टÑीय पातळीवर जाण्यासाठी ते आता सज्ज झाले आहे.सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स संघातील रॉबिन उथप्पा, पीयूष चावला, उन्मुख चंद, अभिषेक नायर यांच्यासह विविध संघांतून रणजी सामने खेळणाऱ्या खेळाडूंनी याठिकाणी सराव केला. यापूर्वी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर १९८२-८३ आणि १९९५-९६ या कालावधीत केवळ सहा सामने झाले होते. मुंबई संघाच्या बडोदा, गुजरात, महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघांबरोबर लढती झाल्या होत्या. मात्र, सध्या शालेय किंवा इतर स्तरांवरील सामने भरवले जात होते. तसेच अ‍ॅथलेटिक्सपटूंसाठीसुद्धा हे मैदान दिले जात होते. परंतु, मागील पाच महिन्यांत ते घडवण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आणि नदीम मेमन यांनी मेहनत घेतली. त्यानुसार, आज या मैदानाचा खºया अर्थाने कायापालट झाला आहे. आता येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार झाली आहे. याठिकाणी सेलिब्रेटी लीगही खेळवण्यात आली होती. सोमवारपासून कोलकाता नाइट रायडर्स या संघाचा नेटमध्ये सराव सुरू झाला आहे. दोन दिवस तो सुरू राहणार असून त्यानंतर बंगळुरू आणि इतर संघांनीही सरावासाठी या स्टेडिअमची मागणी केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.आयपीएलला हवे जाहिरातींसाठीही स्टेडिअमभारताचा महान फलंदाज महेंद्रसिंग धोनी याच्या आयपीएल टीमची जाहिरात, राजस्थान रॉयल्स या संघाचीही जाहिरात आणि एकूणच आयपीएलच्या या सीझनच्या जाहिरातींसाठी दादोजी कोंडदेव क्रीडागृहाची मागणी आली असून लवकरच त्याचा निर्णय घेतला जाणार आहे.लाइट्स आणि छतही बदलले जाणाररात्रीच्या वेळेसही या स्टेडिअममध्ये सराव करण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि भविष्यात रणजी आणि आयपीएल सामने व्हावेत, या उद्देशाने येथे हायमास्ट लाइट्सची व्यवस्था करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरूकेल्या आहेत. यामध्ये सोलर एनर्जीचा वापर करण्याचा पालिकेचा विचार आहे. शिवाय, छतही बदलले जाणार आहे.तीन वर्षांपासून या स्टेडिअमचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न सुरूहोते. त्यानुसार, मागील पाच महिन्यांत त्याची आउटफिल्ड आणि खेळपट्टी तयार केली आहे. या मुंबईच्या जवळ असूनही हे स्टेडिअम दुर्लक्षित होते. परंतु, आता त्याची मागणी वाढली आहे. आंतरराष्टÑीय स्तरावर ठाण्याचे खेळाडू घडावेत, हीच इच्छा होती. त्यानुसार, या स्टेडिअमची खेळपट्टी तयार केली आहे.- नदीम मेमन, खेळपट्टी तयार करणारेपाच महिन्यांपूर्वी येथील खेळपट्टी पाहिली होती. त्यानंतर, आज येथील खेळपट्टी आणि आउटफिल्डमध्ये कमालीचा बदल झाला आहे. येथील खेळपट्टी आंतरराष्टÑीय दर्जाची झाली असून भविष्यात येथे रणजी सामने व्हावेत, ही इच्छा आहे.- ओमकार साळवी, बॉलिंग कोच, कोलकाता नाइट रायडर्स

टॅग्स :thaneठाणे