शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्र्रत्येकाने लिखाण केल्यास वैचारिक क्रांती होईल : डॉ. विजय बेडेकर यांचे ठाण्यात प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 16:56 IST

डॉ. बेडेकर विद्या मंदीर माध्यमिक विभागाच्या शिक्षीका साधना जोशी लिखित ‘जयोस्तुते’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला

ठळक मुद्देजास्तीत जास्त वाचन करुन मन व बुद्धी उत्तम संस्कारीत व्हायला हवी : डॉ. विजय बेडेकर‘जयोस्तुते’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्नसावरकरांची प्रतिमा डॉ. बेडेकर यांना भेट

ठाणे : कोमल प्रकाशनच्यावतीने डॉ. बेडेकर विद्या मंदीर माध्यमिक विभागाच्या शिक्षीका साधना जोशी लिखित ‘जयोस्तुते’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विद्यालंकार सभागृहात संपन्न झाला. यावेळी समाज प्रबोधनासाठी सावरकर विचार अशा पुस्तकांच्या माध्यमातून पसरले जाणे गरजेचे आहे असे मत डॉ. विजय बेडेकर यांनी व्यक्त केले.     डॉ. बेडेकर म्हणाले की, जास्तीत जास्त वाचन करुन मन व बुद्धी उत्तम संस्कारीत व्हायला हवी असे मत देखील त्यांनी मांडले. समाज प्रबोधनासाठी सावरकर विचार अशा पुस्तकांच्या माध्यमातून पसरले जाणे गरजेचे आहे. मराठी भाषा टिकवण्याचे आवाहन करीत ते म्हणाले की, सावरकर कालातीत आहे त्यांनी आपल्याला खुप दिले आहे आता आपण त्यांना परत देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सावरकर साहित्य वाचा, भाषेवर प्रेम करा, उत्तम नागरिक बना असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ व सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकरराव गोखले, विद्या प्रसारक मंडळाचे सभासद उत्तम जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पांचाळ यांनी तर आभार संध्या झंझाड यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उदय सप्रे यांनी केले. सावरकरांच्या निवडक कवितांचे विवेचन या पुस्तकात केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गोखले यांनी संस्थेच्यावतीने सावरकरांची प्रतिमा डॉ. बेडेकर यांना भेट दिली. सुमेधा बेडेकर यांनी सादर केलेल्या ‘ने मजसी ने’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई