शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

साडेतीन कोटींंची आइस फॅक्टरी

By admin | Updated: July 15, 2016 01:24 IST

राज्य शासनाच्या एन सी डी सी योजनेअंतर्गत ३ कोटी ३४ लाखाच्या निधीमधून सातपाटी येथे उभारण्यात आलेल्या ७० टन उत्पादन क्षमतेचे व ४०० टन साठवणूक क्षमतेच्या आधुनिक

पालघर : राज्य शासनाच्या एन सी डी सी योजनेअंतर्गत ३ कोटी ३४ लाखाच्या निधीमधून सातपाटी येथे उभारण्यात आलेल्या ७० टन उत्पादन क्षमतेचे व ४०० टन साठवणूक क्षमतेच्या आधुनिक नवीन आईस फॅक्टरी व शीतगृह प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी डॉ. दादा परूळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शीतगृहाचा उपयोग किनाऱ्यावरील मुरबे, एडवण, वडराई, माहिम, केळवे, इ. अनेक गावातील मासेमारी व्यवसायाला होणार आहे.शेटजी, सावकारापासून ते सर्व प्रकारच्या फसवणूक-पिळवणूकीपासून गरीब मच्छिमारांची मुक्तता करण्याची महत्वपूर्ण कामगिरी सातपाटीच्या दोन्ही सहकारी संस्थानी केली आहे. त्यांच्या कार्यामुळेच ६९ वर्षापूर्वी लावलेल्या छोटयाशा रोपटयाचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पहावयास मिळत असल्याचे गौरवोद्गार डॉ. विनायक उर्फ दादा परूळेकर यांनी काढले. यावेळी अध्यक्ष-नरेंद्र पाटील, आमदार अमीत घोडा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, सरपंच कांचन मेहेर, रामकृष्ण केणी, इ. मान्यवरवर उपस्थित होते.मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त विनोद नाईक यांच्या संकल्पनेतून सातपाटी मध्ये अद्ययावत शीतगृह उभारणीची कल्पना सर्वोदय संस्थेच्या माजी चेअरमनांची होती. सन २००५-०६ मध्ये एनसीडीसी अंतर्गत शीतगृहाच्या उभारणीचा प्रस्ताव देण्यात आला. त्यातून आज भव्य असे बर्फ उत्पादन व साठवणुकीचे शीतगृह उभे राहिले. गावच्या वैभवामध्ये या वास्तूने भर घातली असून मोरारजी देसाई यांनी १९५६ साली उद्घाटन केलेल्या बर्फ कारखान्यानंतर हा नवा अद्ययावत बर्फ कारखाना साकारणे हे एक प्रगतीचे लक्षण असल्याचेही डॉ. परूळेकर यांनी सांगितले.सातपाटी गावच्या दोन पिढया मी जवळून पाहत असताना आजही ७५ वर्षीय वृध्द मासेमारीला समुद्रात जात असल्याचे पाहिल्यानंतर त्यांच्या मेहनतीला सलाम करावासा वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)