शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

मुंबईला जाऊन हीरो व्हायचंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या ७ महिन्यांत मध्य रेल्वेवरील विविध विभागांतील रेल्वे स्थानकांच्या रेल्वे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या ७ महिन्यांत मध्य रेल्वेवरील विविध विभागांतील रेल्वे स्थानकांच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरून ४७७ मुलांना शोधले आणि त्यांना विविध नाद, व्यसनातून सोडवले. चाइल्ड लाइनसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून आणली. त्यापैकी बरेच जण कौटुंबिक भांडण किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे, चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात मिळेल त्या गाडीने मुंबईला आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना ते प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे स्थानकांजवळ किंवा कधी कधी गाड्यांमध्येही फिरताना आढळले की, ते लगेचच त्यांना बोलके करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक लहान मुले वाईट वळणाला लागण्यापासून वाचलेली आहेत. रेल्वेच्या या उत्कृष्ट सेवेबद्दल पालक मनापासून कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतात.

मुंबई, ठाणे परिसरात समतोल फाउंडेशनसारख्या सामाजिक संस्था अशा मुलांना शोधून त्यांच्याशी जवळीक करून त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यासाठी खूप मोठे काम करत आहेत. या संस्थेचे संस्थापक विजय जाधव यांनी सांगितले की, वर्षाकाठी सुमारे ६०० मुले, मुली पळून येतात. देशाच्या विविध भागांतून ते येतात. त्यांना शोधून संपर्कात ठेवणे आणि पुन्हा घरी पाठवणे, हे मोठे आव्हान असते.

---------------------

पळून येणाऱ्यांत मुलांचे प्रमाण सर्वाधिक असते, मुली तुलनेने कमी असल्याचा निष्कर्ष अनेक वर्षांचा अभ्यास करून काढल्याचे समतोल फाउंडेशनचे विजय जाधव म्हणाले.

-------------

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकात आढळलेली मुले

२०१८ सुमारे ६००

२०१९ सुमारे ५००

२०२० आकडेवारी उपलब्ध नाही

२०२१ (जुलैपर्यंत) मुंबई विभागात १६६

--/-/----------

का येतात पळून मुले?

कोणाला बंगला-गाडीचे आकर्षण, तर कोणाला घरातील वादाचा कंटाळा, अभ्यासाचा कंटाळा, तर चित्रपटाचे आकर्षण, सहमित्रांची साथ, पैसे, चंगळवाद, झटपट पैसा, ग्लॅमर, अल्पावधीतच मोठे होण्याचे आकर्षण.

------------------

एका प्रकरणात २४ जुलै रोजी कर्तव्यावरील ट्रेन तिकीट परीक्षक (टीटीई) नरेंद्र मिश्रा यांना एक १७ वर्षांची मुलगी एका ट्रेनमध्ये कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान एकटी प्रवास करताना आढळली. लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचल्यावर टीटीईने तिला ड्यूटीवर असलेल्या महिला आरपीएफने चाइल्डलाइन संस्थेच्या शारदा कांबळे यांच्याकडे सोपवले. चाइल्ड लाइन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आरपीएफ उपनिरीक्षक बबलू कुमार यांनी तिची चौकशी केली असता तिने तिचे नाव शीतल (नाव बदलले आहे) सांगितले. ती बिहारच्या पाटणा येथे राहते आणि मुंबईत मॉडेलिंग/अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी कोणालाही न सांगता पळून आल्याचेही तिने सांगितले. पुढील कारवाईसाठी चाइल्ड लाइन कर्मचारी शारदा कांबळे आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल पूनम तिवारी यांनी त्या मुलीला बालसुधारगृह, डोंगरी यांच्याकडे सुपुर्द केले.

---------------------

दुसऱ्या एका घटनेत, मेहबूबनगर जिल्ह्यातील १४ वर्षीय मुलगी तिच्या आईने फटकारल्यानंतर घरातून पळून निजामुद्दीन- पुणे यशवंतपूर एक्स्प्रेस या विशेष गाडीने आली. आरपीएफ कॉन्स्टेबल शशिकांत जाधव आणि महिला कॉन्स्टेबल पी. श्रीवास यांना १४ जुलै रोजी हडपसर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर ती सापडली. चौकशी केल्यावर मुलीने तिचे नाव गीतांजली (नाव बदलले) सांगितले. ती फक्त तेलगू बोलू शकत होती. तिने दिलेल्या नंबरवर तिच्या काकांशी संपर्क साधला. त्यानंतर आरपीएफने पुढील कारवाईसाठी मुलीला साथी एनजीओकडे सोपवले.

--- -------------