शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक सर्जरीमुळे मला नवे जीवनच मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 23:52 IST

जळणे, भाजणे, कापणे यामुळे चेहरा विद्रुप होण्याबरोबरच काही वेळा शरीराचा एखादा अवयव पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही.

- योगेश बिडवई जळणे, भाजणे, कापणे यामुळे चेहरा विद्रुप होण्याबरोबरच काही वेळा शरीराचा एखादा अवयव पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. अशा वेळी प्लास्टिक सर्जरीमुळे मात करता येते. ती महाग असल्याने चित्रपटातील तारे करतात, असा समज असतो. मात्र सर्वसामान्य माणूसही त्याद्वारे आपल्या व्यंगावर मात करू शकतो. विजेच्या धक्क्यामुळे दानिश खाटीक हा तरूण हाताची बोटे हलवू शकत नव्हता. या सर्जरीमुळे त्याची बोटे पूर्ववत झाली आहेत. १५ जुलैच्या प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त दानिश याने ‘लोकमत’शी साधलेला हा संवाद.तुझ्या डाव्या हाताची बोटे हलत नव्हती, ही दुर्घटना कशी घडली?मी घरातील पाण्याची मोटार सुरू केल्यानंतर काही तांत्रिक कारणाने ती सुरू झाली नाही. म्हणून तिला हात लावल्यानंतर विजेचा जोरदार धक्का बसल्याने मला काहीच कळाले नाही. नंतर मी माझे काम करायला लागलो. मात्र नंतर काही दिवसांनी मला लक्षात आले, मी डाव्या हाताने जड वस्तू उचलू शकत नाही. मी हाताने काम करू शकत नाही. हाताची मूठ वळल्यानंतर मी लवकर बोटे सरळ करू शकत नव्हतो.या दुर्घटनेनंतर तुझी मानसिक स्थिती कशी होती?मी डाव्या हाताने लिहीत असल्याने व त्याच हाताची हालचाल मंदावल्याने मला उजव्या हाताने लिहायची सवय करावी लागली. मात्र त्या हाताने चांगले लिहू शकत नव्हतो. त्यामुळे अभ्यासात अडचण यायला लागली. माझे वडील शेळीपालन करतात. या आजारावर खूप पैसे खर्च होतील, अशी भीती होती. भुसावळ, जळगाव येथे तज्ज्ञांचा अभाव असल्याने डोंबिवलीतील प्लास्टिक सर्जन डॉ. प्रितीश भावसार यांना दाखविले. प्लास्टिक सर्जरीने तुमची बोटे पूर्ववत होऊ शकतात, असे सांगितल्यावर जीवात जीव आला.सर्जरीनंतर तुला कसे वाटते? तुझी पुढची स्वप्ने आता पूर्ण होतील, असे तुला वाटते का?हो, प्लास्टिक सर्जरीनंतर माझ्या बोटांची आता पूर्ववर हालचाल होते. मी पूर्वीप्रमाणे काम करू शकतो. जड वस्तू उचलू शकतो. माझे महाविद्यालय पूर्वीप्रमाणे सुरू आहे. मी आता एफवायबीएला आहे. पूर्वीप्रमाणे मी लिहू शकतो. माझी कामे करू शकतो. प्लास्टिक सर्जरीमुळे मला एकप्रकारे नवे जीवनच मिळाले आहे असा विश्वास दानिशयाने या वेळी व्यक्त केला.प्लास्टिक सर्जरी म्हटल्यानंतर खूप महागडी असेल. प्लास्टिक सर्जरी केवळ मोठमोठे अभिनेते-अभिनेत्री करतात, असे मला वाटत होते. मात्र डॉ. भावसार यांनी सर्व समजावून सांगितले. माफक खर्चात माझे उपचार झाले. माझ्या कुटुंबाला मोठा आर्थिक ताण पडला नाही. याचेही मला समाधान आहे.