शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मला आजची शिक्षण पद्धती पटत नाही : सुहास जोशी यांचे स्पष्ट मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 16:51 IST

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अभिनय क्षेत्राच्या अनेक आठवणी उलगडण्यात आल.

ठळक मुद्देमला आजची शिक्षण पद्धती पटत नाही : सुहास जोशीडॉ. अनंत देशमुख यांनी साधला सुहास जोशी यांच्याशी संवाद परिक्षणात गोष्ट सांगितली जाते : सुहास जोशी

ठाणे: कडक गुरू मिळाल्याशिवाय कडक शिक्षण मिळत नाही. गुरुंनी दणके दिल्यावर चूक कळलीच पाहिजे. मात्र, आज मुलांना मारायचे नाही असा नियम आहे. मला आजची शिक्षण पद्धती पटत नाही असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी व्यक्त केले.हितवधिर्नी सभा आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय येथे डॉ. अनंत देशमुख यांनी जोशी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्राचा प्रवास उलगडला. माझ्या महाविद्यालयीन काळात दरवर्षी तीन अंकी नाटक होत असे. परंतू ही नाटके आता पाहायला मिळत नाही. नाटकाचा मूळ ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे नाटक आहे. सई परांजपे यांच्यामुळे मला ड्रामा स्कूलला जायचे होते हे सांगताना त्या म्हणाल्या की, हौस म्हणून नाटक करणे वेगळे आणि शास्त्रोक्त पदधतीने नाटक शिकणे वेगळे आहे. म्हणूनच मी नाटक शिकायचे ठरवले आणि स्कॉलरशीप मिळवून ड्रामा स्कूलला गेले. यावेळी त्यांनी बॅरिस्टर हे नाटक कसे मिळाले याचा उलगडा केला. अग्नीपंख या अडीच तासांच्या नाटकात ११ वेळा नऊवारी साडी बदलली. या नाटकाचे १५० प्रयोग केल्याची आठवण त्यांनी सांगितले. प्रेक्षक जेव्हा नाटक पाहायला येतात तेव्हा त्यांना रिअ‍ॅलिटी दाखवायची असते. नाटकांतून दरवेळी प्रगल्भता येत असते. त्या प्रगल्भतेचे उदाहरण म्हणजे आत्मकथा हे नाटक हे सांगताना त्या म्हणाल्या की, प्रेक्षकांनी वेगळ््या विषयांवरची नाटके देखील पाहिली पाहिजेत आणि त्यावर चर्चा केली पाहिजे. डोक्याचा ताप घालविण्यासाठी नाटक पाहायला जाऊ नका, नाटक हा करमणूकीचा भाग असला तरी तो नवरसात एन्जॉय करा. आम्ही नाटकाच्या तालमी परफेक्शन होईपर्यंत करतो आणि तेच परफेक्शन प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करतो पण त्याकडे प्रेक्षक जात नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. ज्या नाटकांची खरी परिक्षण केली पाहिजे ते होत नाही. परिक्षणात गोष्ट सांगितली जाते. परिक्षण कसे करावे हे देखील आम्ही ड्रामा स्कूलमध्ये शिकलो असेही त्या म्हणाल्या.

 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईinterviewमुलाखत